-
नासा/ईएसएच्या हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळात २५ वर्षे शोध कार्य केले आहे. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
विश्वाच्या उत्पत्तीविषयी रहस्य उलगडण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाचा शेकडो वर्षांपासून अंतराळा संबंधी जाणून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
आम्ही तुम्हाला हबल दुर्बीणांने टिपलेली मनाला भावणारी काही छायाचित्रे दाखवणार आहोत. पुढे पाहा हबल टेलिस्कोपने टिपलेले विहंगम दृश्य… (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
चित्राच्या मध्यभागी एक चकाकणारा चमकदार तारा आहे, जो वायू आणि धुळीच्या जाड, केशरी ढगांनी धुसर झाला आहे. प्रतिमेच्या कडांच्या बाजूने तेजस्वी तारे अवकाशाच्या काळ्या-काळ्या पार्श्वभूमीच्या विरुद्ध दिसून येत आहेत. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
एक उज्ज्वल आकाशगंगा, NGC 1961 पृथ्वीपासून सुमारे १८० दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर असलेल्या कॅमेलोपार्डालिस नक्षत्रात दिसू शकते. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
UGC 9391 नावाने ओळखली जाणारी ही भव्य आकाशगंगा ड्रॅको नक्षत्रात तब्बल १३० दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर राहते. ताऱ्यांनी भरलेली सर्पिलाकार दीर्घिका, बॅकग्राऊंडला आकाशगंगा आणि त्यावर चकाकणाऱ्या ताऱ्यांद्वारे प्रकाशित झालेली दिसत आहे. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
तारकीय नर्सरी N१५९ च्या या प्रतिमेमध्ये तारे आधीपासूनच चमकत आहेत. हे N१५९ आपल्याहून १६० हजाराहून अधिक प्रकाशवर्षे दूर आहेत. हे अस्पष्ट वैश्विक दृश्य ताऱ्याला जन्म देणारा प्रदेश दर्शवतं. तपकिरी आणि निळ्या धुळीच्या तंतूंमध्ये तेजस्वी तारे क्वचितच दिसू शकतात. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
Arp-Madore 608-333 ही एक आकाशगंगाची जोडी आहे जी, पहिल्या क्षणातच त्यांच्यातील परस्पर गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकांना वक्राकार करते आणि रचना ओबडधोबड करते. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
हे चित्र दोन दुर्बिणी आणि दोन दूरच्या आकाशगंगांची दृश्यांना एकत्र करते. आकाशगंगा जोडी VV 191 ची ही चित्तथरारक प्रतिमा NASA च्या जेम्स वेब टेलिस्कोपमधील अल्ट्राव्हायोलेट आणि NASA च्या हबल स्पेस टेलिस्कोपमधील विजीबल लाईटमधला इन्फ्रारेड डेटा एकत्रीत करून तयार केलेली आहे.(Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
चकाकणाऱ्या तार्याभोवती असलेली सामग्री तार्यामधून वायू आणि धूळ यांच्या दुहेरी प्रवाहात जाताना दिसत आहे. परंतु या प्रकरणात, २१७ मैल प्रति सेकंद (३५० किमी/से) वेगाने प्रवास करणार्या सामग्रीचा पंखासारखा स्प्रे या प्रतिमेच्या मध्यभागातून बाहेर पसरत आहे. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
-
ही हबल प्रतिमा आश्चर्यकारक ओरियन नेबुलाची आहे, जो पृथ्वीच्या सर्वात जवळचा मोठा तारा बनवणारा प्रदेश आहे. प्रतिमेतील केशरी रंग हा हायड्रोजनमुळे तयार झालेला आहे. हिरवा रंग ऑक्सिजनमुळे तयार झालेला आहे. तर लाल रंग सल्फर आणि इन्फ्रारेड प्रकाशामुळे तयार झालेला आहे. (Image source: Hubble Space Telescope/Instagram)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल