-
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. वयाच्या ८०व्या वर्षातही बिग बी त्यांच्या अफलातून अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
-
‘झंजीर’, ‘अग्निपथ’, ‘सौदागर’, ‘सिलसिला’, ‘गंगा की सौंगध’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘अग्निपथ’ असे एक सो एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले आहेत.
-
अमिताभ यांच्या अभिनयाचे, त्यांच्या स्टाइलचे लाखो दिवाने आहेत. त्यांच्या चित्रपटातील अनेक फेमस डायलॉगही कित्येकांच्या आजही ओठी असतात.
-
डायलॉगप्रमाणेच अमिताभ यांच्या चित्रपटातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. प्रत्येक समारंभात त्यांच्या गाण्यांनी चार चांद लागल्याशिवाय राहत नाहीत.
-
अमिताभ बच्चन यांची किर्ती जगभरात पसरलेली आहे. त्यांचे केवळ भारतातच नाही तर जगभरात लाखो चाहते आहेत.
-
बिग बींच्या या लोकप्रियतेची प्रचिती ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनादेखील परदेशात असताना आली.
-
सुधा मूर्ती या इराणमध्ये फिरायला गेल्या होत्या. इराणमधील बाजारपेठेत फेरफटका मारत असताना त्यांना गरमागरम नान पाहून ते खाण्याची त्यांना इच्छा झाली.
-
दुकानदाराकडून त्यांनी नान घेऊन पैसे विचारले. पण त्या दुकानदाराला सुधा मूर्ती इंग्रजीमध्ये काय बोलत आहेत हे कळत नव्हतं. आणि त्याची भाषा सुधा मूर्ती यांना समजत नव्हती.
-
त्यामुळे सुधा मूर्तींनी दुकानदाराला त्यांच्याजवळील एक नोट काढून दिली. नानचे पैसे घेऊन उरलेली रक्कम दुकानदार परत करेल, अशी त्यांना अपेक्षा होती.
-
त्यावेळी सुधा मूर्ती यांनी साडी नेसून कपाळावर कुंकू लावून पारंपरिक भारतीय पोशाख केला होता. तो दुकानदार सुधा मूर्ती यांच्याकडे पाहतच राहिला.
-
सुधा मूर्ती यांना निरखून पाहिल्यानंतर त्याने “अमिताभ बच्चन?”, असं विचारलं. दुकानदार असं का विचारत आहे, हे सुधा मूर्तींना पटकन कळलं नाही.
-
त्या दुकानदाराने बॉलिवूडमधील आणखी काही सेलिब्रिटींची नावे घेतली. तेव्हा सुधा मूर्तींनी त्याला “हो, या सर्वांचा जो देश आहे मी तिथूनच आले आहे”, असं म्हटलं.
-
सुधा मूर्ती अमिताभ बच्चन यांच्या देशातून आहेत हे कळल्यानंतर त्या दुकानदाराने त्यांचे पैसे परत देत “नो मनी”, असं म्हटलं.
-
त्याला पैसे घेण्यासाठी सुधा मूर्ती यांनी आग्रह केल्यानंतर तो म्हणाला, “इंडिया बॉलिवूड इज व्हेरी नाईस. गुड डान्स, गुड ड्रेस, गुड म्युझिक. इराणियन लाइक”.
-
त्यानंतर ते नान घेऊन सुधा मूर्ती हॉटेलवर परतल्या. रुममधील टीव्ही लावताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
-
टीव्हीवर ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट लागला होता. अमिताभ बच्चन जया बच्चन यांच्याशी पार्शियन भाषेत संवाद साधत होते.
-
हे पाहून सुधा मूर्ती बॉलिवूड आणि अमिताभ बच्चन यांची जगभरातील लोकप्रियता पाहून भारावून गेल्या होत्या.
-
सुधा मूर्ती यांनी त्यांच्या ‘तीन हजार टाके’ या पुस्तकात त्यांच्याबरोबर घडलेल्या या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”