-
नवेगाव-नागझिरा अभयारण्यातून स्थलांतर करुन उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात स्थिरावणारा जगप्रसिद्ध ‘जय’ हा वाघ आणि चांदीप्रमाणे चकाकणारी वाघीण ‘चांदी’ यांच्या चार अपत्यांपैकी एक म्हणजे ‘बाहू’हा वाघ.
-
या अभयारण्यात जन्मलेली ‘जयचंद’, ‘बाहू’, ‘बली’ आणि ‘बरखा’ ही या दोघांची चार अपत्य.
-
ती थोडीफार ‘चांदी’वर गेली असली तरीही शक्तीशाली ती ‘जय’ सारखीच होती.
-
‘जय’ हा वाघ अतिशय शक्तीशाली होता. कुणालाही न भिता, कुणाचीही तमा न बाळगता तो कधी राष्ट्रीय महामार्गावर तर कधी नदी-नाल्यांवर दिसायचा.
-
त्याच्याचसारखी त्याची दोन अपत्ये ‘बाहू’ आणि ‘बली’.
-
शक्तीशाली ‘जय’चे ते अपत्य असल्याने ‘बाहूबली’ या सुप्रसिद्ध चित्रपटावरुन त्यांची नावे ठेवण्यात आली.
-
‘बाहू-बली’ मधील ‘बली’ने ‘जय’प्रमाणेच भटकंती केली. दरम्यानच्या काळात तो देखील ‘जय’ सारखाच बेपत्ता झाला होता.
-
२०१६ मध्येच त्याने उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य सोडले. तुलनेने ‘बाहू’ने त्याचे क्षेत्र विस्तारले नाही.
-
छायाचित्रे – धनंजय खेडकर (हेही पाहा : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान ‘छोटी तारा’)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा