-
सोशल मीडियावर कालपासून करवाचौथचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. (Photo: Instagram)
-
सेलिब्रिटी ते राजकारणी अनेकांनी आपल्या ‘बेटर हाफ’ सह फोटो पोस्ट करून करवाचौथच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अशातच आता भाजप खासदार अर्जुनलाल मीणा यांचे पत्नींसह करवाचौथचे फोटो सोशल मीडियावर खास चर्चेत आहेत. (Photo: Twitter)
-
पत्नींसह शब्द वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना? पण खरंच मीणा हे दोन पत्नींसह करवाचौथ साजरा करत असलयाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (Photo: Twitter)
-
या फोटोसह व्हायरल होणाऱ्या पोस्ट मध्ये अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी त्यांच्यासाठी करवाचौथचे व्रत करत असल्याचे सांगण्यात आले आहे. (Photo: अर्जुनलाल मीणा/ Twitter)
-
अर्जुनलाल मीणा उदयपुर येथील भाजपचे खासदार आहेत. मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांनी मोठा विजय मिळवून लोकसभेत जागा निश्चित केली आहे.(Photo: अर्जुनलाल मीणा/ Twitter)
-
मीडिया रिपोर्ट व सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनुसार अर्जुनलाल मीणा यांच्या दोन्ही पत्नी या एकमेकींच्या सख्या बहिणी असल्याचे सांगितले जाते. (Photo: अर्जुनलाल मीणा/ Twitter)
-
अर्जुनलाल यांच्या पत्नीचे नाव मिनाक्षी व राजकुमारी असे आहे. यातील एक शिक्षिका तर दुसरी गॅस एजेन्सीची मालकीण आहे. (Photo: अर्जुनलाल मीणा/ Twitter)
-
अर्जुनलाल यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार मात्र त्यांची एकच पत्नी असून त्यांचे नाव मीना मसार आहे.
-
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही पत्नीसह करवाचौथ साजरा करून त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. (Photo: Anurag Thakur Twitter)
-
अनुराग ठाकूर व त्यांची पत्नी इंडिया गेट येथे करवाचौथ साजरा करताना दिसून आले होते. (Photo: Anurag Thakur Twitter)
-
बीजेपी प्रवक्ता गौरव भाटिया यांनी मागील वर्षीच्या करवा चौथचा फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo: Gaurav Bhatia Twitter)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन