-
सध्या सोशल मीडियावर एक ६० वर्षीय व्यक्ती प्रचंड चर्चेत आहे. खरं तर वयाच्या या टप्प्यावरही या व्यक्तीने आपले शरीर इतके तंदुरुस्त आणि मेंटेन केले आहे की पाहणाऱ्यांनाही हेवा वाटायला लागतो.
-
अवघ्या वर्षभरात ब्रिटनच्या स्टीव्ह रॅम्सडेनने इतके अप्रतिम मसल्स आणि सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत की, त्याला पाहून तरुणांनाही लाज वाटेल.
-
या एक्स्ट्रीम बॉडी ट्रांसफॉर्मेशनसाठी स्टीव्हने जिममध्ये प्रचंड घाम गाळला आहे.
-
लीड्स येथील स्टीव्ह हे पॅरामेडिक असून यॉर्कशायर रुग्णवाहिका सेवेसाठी काम करतात.
-
त्यांनी आपल्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने लोकांना आश्चर्यचकित केले आहे.
-
आधीपासूच आरोग्याच्या समस्या असतानाही त्यांनी हे आश्चर्यकारकपणे केले आणि आता ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.
-
एक वर्षापूर्वीपर्यंत स्टीव्ह हाय कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या आजारांशी झुंज देत होते.
-
जास्त वजन वाढल्यानंतर त्यांनी जिममध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि व्यायामाचं योग्य नियोजन केलं.
-
एकेकाळी स्टीव्हचे वजन १०० किलो होते. आता त्यांचे वजन ७२ किलो आहे.
-
वयाच्या ६० व्या वर्षी इतके सुरेख शरीर तयार करणाऱ्या स्टीव्हसाठीही हे काम सोपे होते. कारण त्यांचा मुलगा स्वतः जिम चालवतो.
-
मुलगा डॅनच्या म्हणण्यानुसार, स्टीव्हने १२ आठवड्यात ट्रान्सफॉर्मेशन कोर्स पूर्ण केला होता.
-
याशिवाय आहारावर नियंत्रण ठेवण्यातही त्यांना यश आले.
-
स्टीव्ह म्हणतात की, आता त्यांना मधुमेहाचीही चिंता नाही. ते पुन्हा मोकळेपणाने जीवन जगू लागले आहेत.
-
स्टीव्ह यांनी सांगितले की, त्यांनी दारू पिणे देखील सोडले आहे.
-
यासोबतच अनहेल्दी फूडपासून अंतर ठेवलं आहे. त्यांना आता पूर्वीपेक्षा खूप बरं वाटत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. (Photo: Instagram/ Steve Ramsden)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल