-
माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात.
-
नुकतंच त्यांनी पत्नी मेधासह छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात हजेरी लावली.
-
अभिनेता डॉ. निलेश साबळेने कार्यक्रमात त्यांना बोलतं केलं. यावेळी किरीट सोमय्यांनी त्यांची लव्हस्टोरी आणि पत्नीबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला.
-
“माझी आणि मेधाची पहिली भेट जेलमध्ये झाली होती”, असं किरीट सोमय्या म्हणताच कार्यक्रमातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
-
ते पुढे म्हणाले, “आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत आम्ही सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्ही विद्यार्थी होतो. तेव्हा सत्याग्रह केला होता. त्या सत्याग्रहामुळे आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं”.
-
“आर्थर रोड जेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं होतं. तिथे आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो”, असं किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी सांगितलं.
-
किरीट सोमय्या पुढे “त्यानंतर मी तिला सत्याचा आग्रह करत प्रपोज केलं”, असं मजेशीर पद्धतीने म्हणाले.
-
मेधा यांनी किरीट सोमय्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उघडले.
-
त्या म्हणाल्या, “किरीट सोमय्या फार रोमॅंटिक आहेत. आता त्यांना वेळ मिळत नसला तरी पूर्वी आम्ही दर रविवारी फिरायला जायचो. नाटक, सिनेमा पाहायचो”.
-
“ते एक उत्कृष्ट वडीलही आहेत. मुलांना शाळेत सोडायला जाणे, त्यांना घेऊन येणे. एवढचं काय रोज सकाळी आमच्या घरात त्यांनी बनवलेला चहा लागतो. ते सलाड, पाणीपूरी, शेवपूरी, सॅण्डविच हे पदार्थही उत्तम बनवतात”, असंही त्या म्हणाल्या.
-
किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीमधील प्रेमाचे ऋणानुबंध यानिमित्ताने प्रेक्षकांनाही पाहायला मिळाले.
-
नेहमी इतर पक्षातील नेत्यांवर आरोप करणाऱ्या आक्रमक स्वभावाच्या किरीट सोमय्यांचं यावेळी वेगळंच रुप पाहायला मिळालं.
-
किरीट सोमय्यांसह या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही सहभागी झाल्या होत्या.
-
(सर्व फोटो : झी मराठी)

Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेच्या घरी आली नवी पाहुणी! खरेदी केली आलिशान गाडी, किंमत किती?