-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आव्हान गांभीर्याने घेत मध्य प्रदेशातील उज्जैन येथील भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी काही महिन्यातच तब्बल ३२ किलो वजन कमी केले आहे. (Photo : PTI)
-
अनिल फिरोजिया यांचे वजन पूर्वी १३२ किलोच्या आसपास होते. मात्र, आता ते फिट इंडिया चळवळीत सामील होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
-
नियमित दिनचर्येच्या मदतीने त्यांनी त्यांचे वजन ९३ किलोपर्यंत कमी केले आहे. (ANI)
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जूनमध्ये अनिल फिरोजिया यांना, वजन कमी केल्यास प्रति एक किलो एक हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. (Indian Express File Photo)
-
खासदार अनिल फिरोजिया यांनी ते आश्वासन आव्हान म्हणून स्वीकारले आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत ३२ किलो वजन कमी केले आहे.
-
त्याचवेळी दिलेल्या आश्वासनानुसार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सुमारे २३०० कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी देत अनिल फिरोजिया यांना खास भेट दिली आहे. (Indian Express File Photo)
-
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप खासदार फिरोजिया म्हणाले की, मी गडकरी यांचे बोलणे आव्हान म्हणून स्वीकारले आणि ३२ किलो कमी केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला सांगितले की, वजन कमी केल्यास उज्जैनच्या विकासकामांसाठी प्रति किलो १ हजार कोटी मिळतील.
-
खासदार अनिल फिरोजिया यांनी ते आश्वासन आव्हान म्हणून स्वीकारले आणि वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी परिसराच्या विकासासाठी आतापर्यंत ३२ किलो वजन कमी केले आहे.
-
नितीन गडकरी म्हणाले होते, “अनिल फिरोजिया यांना मी एक अट घातली आहे. माझं वजन त्यांच्यापेक्षा अधिक होतं. माझं वजन १३५ किलोग्रॅम होतं. आता माझं वजन ९३ किलो आहे.” (Indian Express)
-
“त्यामुळे अनिल फिरोजिया जितके किलो वजन कमी करतील तितके हजार कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघासाठी देईन. अनिल फिरोजिया यांना वजन कमी करण्यासाठी मी १ किलोग्रॅममागे १ हजार कोटी रुपये देईन.” (Indian Express)
-
वजन कमी करण्यासाठी अनिल फिरोजिया यांनी काटेकोर डाएट चार्ट पाळला आहे.
-
वजन कमी करण्यासाठी त्यांनी पुण्यातील एका संस्थेची मदत घेतली आहे.
-
संस्थेने दिलेल्या सूचनेनुसार ते दररोज व्यायाम करतात आणि आहार घेतात.
-
पहाटे साडेपाच वाजता फिरोजिया यांचा दिवस सुरू होतो. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जातात.
-
त्यांच्या सकाळच्या वर्कआउटमध्ये धावणे, व्यायाम आणि योगाचा समावेश आहे.
-
वजन नियंत्रित करण्यासाठी फिरोजिया आजकाल आयुर्वेदिक आहार चार्ट फॉलो करत आहेत.
-
ते सकाळी हलका नाश्ता करतात, तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात सलाड, एक वाटी हिरव्या भाज्या आणि मिश्र धान्याची चपाती किंवा भाकरी खातात. तसेच, ते कधी कधी गाजर सूप किंवा ड्रायफ्रुट्स घेतात. (सर्व फोटो : ट्विटर)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल