-
पुणे शहर आणि परिसरामध्ये बुधवारीही (१९ ऑक्टोबर) साडेनऊच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाल्याने पुणेकरांनी त्याचा चांगलाच धसका घेतला.
-
सोमवारी (१७ ऑक्टोबर) रात्री झालेल्या विक्रमी पावसाने शहरात दाणादाण उडवून दिल्याची स्थिती ताजी असताना बुधवारीही तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसत होती. मात्र, अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर ओसरला.
-
शहरावर मोठ्या प्रमाणावर ढग जमा झाले असल्याने रात्री उशिरापर्यंत काही भागांत पावसाच्या हलक्या सरी कायम होत्या.
-
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सोमवारी रात्री साडेनऊनंतर तब्बल तीन तास अतिवृष्टी झाली होती. तीन तासांतच शहरात १०५ ते १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
-
अवघ्या काही वेळातच शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले. घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, अनेक ठिकाणी झाडे, भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या.
-
रात्री अनेक नागरिक शहराच्या विविध भागांत अडकून पडले. काही भागांत वीजही गायब झाली. या पावसाने संपूर्ण शहरात धुमाकूळ घातला.
-
गेल्या अकरा वर्षांतील हा पुण्यातील विक्रमी परतीचा पाऊस ठरला.
-
मंगळवारी (१८ ऑक्टोबर) शहरात सकाळी पावसाची मोठी सर आली होती. त्यानंतर तुरळक भागांत किरकोळ पाऊस झाला.
-
सोमवारी सुमारे ११ किलोमीटर उंचीचे ढग होते. त्यातून पडलेल्या पावसाने शहरात धुमाकूळ घातला. बुधवारीही ७ ते ९ किलोमीटरपर्यंतचे ढग शहरातील आकाशात होते. (सर्व फोटो सौजन्य- Express photographs by Arul Horizon)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ