-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते.
-
सारा ही लाइमलाइटपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
-
काही दिवसांपूर्वी साराने तिचा २५ वा वाढदिवस साजरा केला.
-
याचा सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ तिने शेअर केला होता.
-
त्यानंतर आता ती तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत परदेशात सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.
-
सारा ही सध्या हंग्रीमधील बुधापेस्ट या ठिकाणी फिरताना दिसत आहे.
-
तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
-
“गेल्या आठवड्यात मी २५ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी मी काही दिवसांकरिता हंग्री या ठिकाणी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली होती”, असे सारा म्हणाली.
-
“मी आता पुन्हा परतली असली तरी मी मानसिकरित्या बुधापेस्टमध्ये आहे”, असे ही तिने म्हटले.
-
तिचे या सुट्ट्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
अनेकांनी त्यावर कमेंट करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल