-
आपल्या गाडीला कितीही वर्ष झाली तरी नव्यासारखंच दिसावं यासाठी प्रत्येजण प्रयत्न करतात.
-
जर तुम्हाला तुमच्या कारचा रंग फिका पडू नये, असं वाटत असेल तर तुम्हाला कार धुताना विशेष काळजी घ्यावी लागेल.
-
कार धुण्यासाठी कधीही डिटर्जंट वापरू नका. कार धुण्यासाठी नेहमी कार वॉशर शॅम्पू वापरा. त्यामुळे कारचा रंग सुरक्षित राहण्यास मदत होते.
-
डिटर्जंटने सातत्याने कार धूत राहिल्यास कारच्या रंगाचं नुकसान होऊ शकतं.
-
कार धुल्यानंतर वॅक्सचा वापर करणं उत्तम ठरेल. ही एक अतिशय उपयुक्त क्रीम लेयर असते, जी कारच्या पेंटचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करते.
-
गाडीचा आतील भाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये शाम्पू मिसळून मऊ कापडाने तो साफ करू शकता. त्यामुळे गाडीच्या आतील भागात कोणतेही नुकसान होणार नाही आणि गाडी पूर्णपणे स्वच्छ देखील होईल.
-
तसेच कार धुताना फक्त मऊ वॉशिंग फोम वापरा, किंवा सुती कापड वापरलं तरी चालेल. रफ कापड वापरल्यास रंगाचं नुकसान होण्याची शक्यता असते.
-
गाडीची सफाई करताना गाडीचे टायर साफ करण्यासाठी मोठ्या लाँड्री ब्रशचा वापर करावा. त्यामुळे टायरच्या चरांमध्ये भरलेली माती अगदी सहजपणे काढली जाते आणि त्यामुळे कारचे टायर नव्या सारखे दिसायला लागतील.
-
कारच्या कार्पेटची साफसफाई करण्यासाठी कार्पेट काढून ते व्हॅक्युम क्लिनर किंवा एअर कॉम्प्रेसरच्या मदतीने स्वच्छ करावे.
-
पावसाळ्यात आणि थंडीच्या वातावरणातही गाडीची काळजी घ्यावी.
-
कार चमकवण्यासाठी तुम्ही कंडिशनर, पॉलिशिंग किंवा कोटिंग वापरू शकतात. या गोष्टींचा उपयोग केल्यामुळे तुमच्या गाडीला नुकसान देखील होणार नाही.
-
तुम्ही तुमची गाडी उन्हात कुठेही पार्क करू नये. (फोटो सौजन्य : pixabay)

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?