-
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या गृहमंत्री असण्याच्या काळात त्यांनी कलम ३७०, सीएए सारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.
-
आरएसएसपासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. १९८७साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. २०१४-१९ काळात ते भाजपाचे अध्यक्षही राहिले आहेत.
-
आज अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मालेमत्तेबद्दल जाणून घेऊया.
-
२०१६-१७ मध्ये अमित शाह यांचे वार्षिक उत्पन्न ४३ लाख तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न एक कोटीच्या घरात होते.
-
त्यांनी शेअर्स आणि इतर बॉण्डमध्ये तब्बल १७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
तर एलआयसीमध्ये १४ लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आहे.
-
अमित शाह यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीत वाहनांच्या कॉलमपुढे त्यांनी NIL असा उल्लेख केला आहे.
-
अमित शाह यांच्याकडे ३४ लाख किमतीचे तर त्यांच्या पत्नीकडे ६० लाखांहून अधिक किमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत.
-
अमित शाह आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे दोन कोटींहून अधिक किमतीच्या शेतजमीनीचीही नोंद आहे.
-
याशिवाय पाच कोटींची बिगर शेतजमीनही अमित शाह यांच्या नावावर आहे.
-
अमित शाह आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे तीन कोटी ९५ लाखांच्या व्यावसायिक मालमत्तेची नोंद आहे. तर तीन कोटींचे फ्लॅटही त्यांच्या नावावर आहेत.
-
अमित शाह यांनी बॅंकेतून ४७ लाखांचे कर्ज घेतलेले आहे.
-
निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री अमित शाह एकूण ३४ कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत.
-
(सर्व फोटो : अमित शाह/ फेसबुक)
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच