-
२४ ऑक्टोबरला देशभरात दिवाळीचा उत्साह दिसून आला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन हे दोन्ही मुहूर्त एकाच दिवशी आल्याने दुप्पट उत्साह पाहायला मिळाला. (फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईच्या गल्लीबोळांमध्येही दिवाळीचं खास सेलिब्रेशन दिसून आलं.
-
मुंबईकरांनी दीपावलीच्या संध्याकाळी मरीन ड्राइव्ह, गर्दी केली होती. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
समुद्राच्या लाटांवर उजळत्या दिव्यांचा व फटाक्यांच्या आतिषबाजीचे नयनरम्य प्रतिबिंब दिसून येत होते. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मरीनच्या Queens Necklace कट्ट्यावर मुंबईकरांनी दिवाळीचा जल्लोष साजरा केला. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
सर्व धर्म समभाव व मुंबईकरांचा एकोपा दाखवणारी दृश्य एक्सप्रेसच्या फोटोग्राफर्सनी कॅमेरात कैद केली आहेत. (फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईच्या मध्यभागी स्थित शिवाजी पार्कातही दिवाळी सेलिब्रेशनची सुंदर दृश्य पाहायला मिळाली. (फोटो: संदेश सामंत)
-
रोषणाईने व कंदिलांनी शिवाजी पार्कचे सौंदर्य खुलून आले होते. (फोटो: संदेश सामंत)
-
शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंटवर अशी सुंदर सजावट पाहायला मिळाली. (फोटो: संदेश सामंत)
-
शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ अशी सुंदर विद्युत रोशनी करण्यात आली होती. (फोटो: संदेश सामंत)
-
गेट वे ऑफ इंडियावरही दिवाळी निमित्त मोहक अशी सजावट करण्यात आली होती.(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
ताज हॉटेल व गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूवर दिवाळीचा रंग चढला होता.(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
गेट वे ऑफ इंडियावर दिवाळी सेलिब्रेशनसाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती.(फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)
-
पुण्यातही फटाक्यांच्या आतिषबाजीने आकाश उजळून निघाले होते.(फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?