-
हल्लीच्या जगात प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झालेले व्हॉट्सअॅप भारतात डाऊन झालं आहे. याचा फटका कोट्यावधी युजर्सला बसला.
-
भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं.
-
काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे.
-
सुरुवातीला आधी काही काळ व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. त्याबरोबरच पर्सनल चॅटवरही ब्लू टिक दिसणं बंद झालं.
-
यानंतर काही वेळाने पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरु झाला.
-
जगभरातील नेटकऱ्यांनी व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर मीम्स शेअर करायला सुरुवात केली.
-
तर अनेकांनी व्हॉट्सअॅपची खिल्ली उडवत ते डिलीट करत असल्याचे सांगितले.
-
सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो, व्हिडीओ, गीफ फाईल्स व्हायरल होताना दिसत आहेत.
-
अनेक नेटकरी सातत्याने ट्विटरवर विविध मीम्स शेअर करत आहेत.
-
दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
-
यासंदर्भात व्हॉट्सअॅपकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
-
त्यामुळे हा बिघाड नेमका कधीपर्यंत दुरुस्त होईल? अशी विचारणा नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”