-
मागील ७४ वर्षांपासून एकदाही अंघोळ केलेल्यामुळे जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती अशी ओळख निर्माण झालेल्या अमो हाजी या इराणी व्यक्तीचं निधन झालं आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिल्याचं एएफपी या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. (सर्व फोटो : इराण रिपब्लिक न्यूज एजन्सी आणि सोशल नेटवर्किंगवरुन)
-
अमो हाजी यांनी मागील साडेसात दशकांमध्ये साधं आपलं तोंडही धुतलेलं नव्हतं. अमो हे ९४ वर्षांचे वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षापासून एकदाही अंघोळ केली नव्हती.
-
इराणच्या दक्षिणेला असणारा देगाह गावामध्ये अमो राहत होते. तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याचं आरएएनए या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
-
अमो हे अंघोळ न करण्याची कारणं शोधायचे आणि टाळाटाळ करायचे. नंतर ते अंघोळशिवाय राहू लागले. त्यांना अंघोळ केल्याने आपण आजारी पडू असं वाटायचं अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या वृत्तसंस्थेला दिली होती.
-
मात्र काही महिन्यांपूर्वीच गावातील लोकांनी ७० वर्षांहून अधिक काळापासून अंघोळ न केलेल्या अमो यांना बळजबरीने अंघोळ घातली. तेव्हापासून त्यांना प्रकृतीविषयक समस्या जाणवत असल्याचं वाटू लागलं.
-
जवळजवळ साडेसात दशकांनंतर पहिल्यांदा अंघोळ केल्यानंतर काही महिन्यांमध्येच अमो यांचं निधन झालं. त्यांनी अंघोळ केल्याचा धसका घेतल्याची गावात चर्चा होती.
-
आमो यांच्या संपूर्ण शरीरावर धूळ आणि राख जमल्यासारखं दिसायचं. एखाद्या धुराच्या नळकांड्यामधून बाहेर आल्यानंतर ज्याप्रमाणे त्वचा काळवंडल्यासारखी वाटते तशी अमो यांची त्वचा होती.
-
अमो यांना पाण्याची प्रचंड भीती वाटायची. म्हणूनच ते अंघोळीशिवाय राहायचे. त्यांनी जवळजवळ साडेसात दशकांच्या कालावधीत एकदाही अंघोळ केली नव्हती. आपण अंघोळ केली तर आजारी पडू असं अमो यांना वाटायचं. शरीर स्वच्छ ठेवल्यास त्या स्वच्छतेमुळेच आपण आजारी पडू असा अमो यांचा समज होता.
-
अमो यांचं रहाणीमानही अगदी विचित्र होतं. त्यांना जानवरांचं सडलेलं मांस खायला आवडायचं. खास करुन त्यांना साळींद्राचं मांस त्यांना विशेष आवडायचं. अमो एकाच वेळी पाच सिगारेट प्यायचे.
-
अमो यांना धुम्रपानाची आवड होती. मात्र त्यांची धुम्रपान करण्याची पद्धतही त्यांच्या राहणीमानाप्रमाणे अगदी किळसवाणी होती. ते आपल्या एका जुन्या सिगारसारख्या पाईपमध्ये प्राण्यांचा सुकलेला मैला जाळून त्या सिगारचा धुम्रपानासाठी वापर करायचे.
-
अमो हाजी हे थंडीपासून वाचण्यासाठी डोक्यावर हेल्मेट घालून फिरायचे. ते आगीच्या मदतीनेच आपल्या शरीरावरील केस कापायचे.
-
पाण्याची भीती वाटत असली तरी ते त्यांच्याकडील एका गंजलेल्या मोठ्या आकाराच्या भांड्यातून रोज पाच लीटर पाणी प्यायचे. अमो हे जमीनीतील मोठे खड्डे, पडक्या इमारतींच्या आडोश्याला राहायचे.
-
गावात त्यांना घरं नव्हतं. त्यांची अवस्था पाहून काही लोकांनी पुढाकार घेऊन त्यांना एक कच्च्या भिंती असणारा एक निवारा बांधून दिला होता.
-
अमो यांना गाड्यांच्या साईड मिररमध्ये स्वत:ला पाहायला खूप आवडयचं. ‘तेरहान टाइम्स’च्या वृत्तानुसार तरुण वयामध्ये अमो यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे त्यांच्यावर मोठा भावनिक आघात झाला होता.
-
या मनासिक आघातानंतर अमो यांनी एकांतात राहण्याचा निर्णय घेतला. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते एकटेच राहायचे.

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल