-
भारतात दिवाळी साजरी होत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला.
-
सुनक माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते म्हणून सुनक यांची निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
-
प्रथेप्रमाणे ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी सुनक यांची अधिकृतरित्या ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत.
-
सुनक हे पंतप्रधान झाल्याने भारतीयांनी विशेष आनंद साजरा केला आहे. सुनक हे भारतीय वंशाचे असल्याने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरच त्यांची नियुक्ती झाल्याचा योगायोग जुळून आल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.
-
मात्र ऋषी यांची भारतीयांशी नाळ जोडणारी आणखीन एक ओळख सांगायची झाल्यास ते ‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक असणाऱ्या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई आहेत.
-
सुनक यांची पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा प्रवास हा जसा एखाद्या राजकीय चित्रपटाचं कथानक वाटावं तशीच त्यांची खऱ्या आयुष्यातील लव्हस्टोरी ही आहे.
-
पंतप्रधान पदाच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋषी यांनी त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्याबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता.
-
आपण पहिल्यांदा अक्षताला पाहिलं तेव्हाच तिच्यामध्ये काहीतरी खास असल्याची आपल्याला जाणीव झाली असं सुनक यांनी म्हटलंय.
-
‘द सण्डे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये माजी चॅन्सेलर असलेल्या आणि आजच पंतप्रधानपदाची सूत्रं ऋषी सुनक यांनी आपल्या कौटुंबिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणे गप्पा मारल्या होत्या.
-
सिलिकॉन व्हॅलीतील शिक्षण केंद्रांपैकी एक असणाऱ्या स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये पहिल्यांदा ऋषी आणि अक्षता यांची भेट झाली होती.
-
एमबीएचं शिक्षण घेताना ऋषी आणि अक्षता दोघे पहिल्यांदा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.
-
त्यानंतर ऋषी आणि अक्षता यांनी २००६ मध्ये बंगळुरु येथे दोन दिवसांच्या समारंभामध्ये लग्नगाठ बांधली.
-
ऋषी यांचा जन्म इंग्लंडमधील साऊथहॅम्टन येथील असला तरी त्यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत.
-
या मुलाखतीमध्ये ऋषी यांनी अक्षताला भेटता यावं म्हणून ते विद्यापीठात शिक्षण घेताना अनेकदा अतिरिक्त लेक्चरला बसायचे, असंही सांगितलं.
-
केवळ अक्षताच्या बाजूला बसता यावं म्हणून मी अतिरिक्त क्लासेसला हजेरी लावायचो असंही ऋषी यांनी सांगितलं.
-
“अभ्यासक्रमानुसार मला त्या लेक्चर्सची गरज नव्हती मात्र एकमेकांच्या शेजरी बसता येईल म्हणून मी त्याला हजेरी लावायचो,” असं ऋषी म्हणाले होते.
-
ऋषी आणि अक्षता यांना दोन मुली आहेत. यापैकी कृष्णा ही ११ वर्षांची असून अनुष्का ही ९ वर्षांची आहे.
-
दोन्ही मुलींचा जन्म झाला तेव्हा आपण अक्षतासोबत असल्याबद्दल ऋषी यांनी समाधान या मुलाखतीमध्ये व्यक्त केलं.
-
“मी फार नशीबवान आहे. जेव्हा आमच्या दोन्ही मुलींचा जन्म झाला तेव्हा मी स्वत:चा व्यवसाय करायचो,” असं ऋषी सांगतात.
-
“स्वत:चा व्यवसाय असल्याने माझ्याकडे माझ्या मुलींसाठी फार वेळ होता,” असं ऋषी सांगतात.
-
पालक म्हणून मुलींच्या जन्मापासून ते त्या तीन वर्षांच्या होईपर्यंत मला त्यांना वेळ देता आला हे मला फार समाधान देणारं वाटतं, असं ऋषी म्हणाले.
-
मी आता जेव्हा प्रचारात असतो तेव्हा लहान मुलं दिसलं की आपसुकच मी हात पुढे करतो, असं ऋषी यांनी म्हटलंय.
-
लहान मुलांसोबत वेळ घालवायला आपल्याला आवडतं असंही ऋषी यांनी सांगितलं.
-
आपल्या यशस्वी संसाराचं रहस्य सांगताना ऋषी यांनी पती पत्नी म्हणून आम्ही दोघे अगदी वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि आवडी निवडी असणाऱ्या व्यक्ती आहोत असं सांगितलं. (सर्व फोटो ट्वीटर आणि फेसबुकवरुन साभार)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”