-
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतली आणि ब्रिटनच्या इतिहासात एक सोनेरी पानं जोडलं गेलं.
-
देशाचे पहिले हिंदू पंतप्रधान होण्याबरोबरच २१० वर्षांमधील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून सुनक देशातील सर्वोच्च पदावर विराजमान झाले.
-
मात्र अशाप्रकारे एखाद्या देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचणारे सुनक हे पहिले भारतीय वंशाचे नेते नाहीत. सध्या अगदी अमेरिकेपासून तो पोर्तुगलपर्यंत अनेक देशांमधील प्रमुख पदावर असणारे नेते हे भारतीय वंशाचे आहेत. याच नेत्यांबद्दल जाणून घेऊयात.
-
प्रविंद कुमार जगन्नाथ- भारतीयांना फारसं ठाऊक नसणारं नाव एका देशाच्या पंतप्रधानांचं असून ते भारतीय वंशाचे आहेत.
-
जगन्नाथ हे मॉरिशियसचे पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान असण्याबरोबरच त्यांच्याकडे देशातील अनेक महत्त्वाची खातीही आहेत.
-
जगन्नाथ यांचा जन्म फ्रान्समधील ला केव्हर्न या शहरात झाला.
-
एका भारतीय कुटुंबामध्ये २५ डिसेंबर १९६० रोजी जगन्नाथ यांचा जन्म झाला.
-
२०१७ पासून जगन्नाथ हे मॉरिशियसचे पंतप्रधान आहेत.
-
कमला हॅरिस – अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा म्हणून कमला हॅरीस यांनी मागील वर्षी पदभार स्वीकारला.
-
जो बायडेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हॅरीस या दुसऱ्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत.
-
डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या असणाऱ्या कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्षा ठरल्या आहेत.
-
कॅलिफॉर्नियाच्या अटॉर्नी जनरल म्हणून २०११ ते २०७ पर्यंत कार्यभार पाहणाऱ्या कमला हॅरीसही भारतीय वंशाच्या आहेत. कमला यांच्या मातोश्री भारतातील तामिळनाडू राज्यातील होत्या.
-
कमला यांच्या विजयानंतर भारतामधील अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने आनंद साजरा करण्यात आला होता.
-
तामिळनाडूमध्ये अनेक जागी कमला यांचे अशाप्रकारे होर्डींगसही लागले होते.
-
चॅन संतोखी – सूरीनाम या दक्षिण अमेरिकेतील छोट्याशा देशामध्ये २०२० साली राजकीय क्रांती घडली आहे. मागील १५ वर्षांपासून एकाच नेत्याला निवडून देणाऱ्या या देशातील नागरिकांनी चॅन संतोखी यांच्या रुपात नवीन राष्ट्राध्यक्ष निवडला.
-
१६ जुलै २०२० रोजी संतोखी यांनी सूरीनामचे नववे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
-
चंद्रीकाप्रसाद चॅन संतोखी हे ६२ वर्षांचे असून ते देशातील प्रोग्रेसिव्ह रिफॉर्म पार्टीचे नेतृत्व करतात. त्यांच्या पक्षाला जनतेने भरघोस मतांनी जिंकून दिलं आहे. हा पक्ष सूरीनाममध्ये Vooruitstrevende Hervormings Partij म्हणजेच VHP नावाने लोकप्रिय आहे.
-
पूर्वी डच लोकांची वसाहत असणाऱ्या सूरीनाममध्येच चंद्रीकाप्रसाद यांचा ३ फेब्रुवारी १९५९ रोजी जन्म झाला आहे. त्यानंतर त्यांनी नेदर्लंडमधील पोलीस अकादमीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
-
संतोखी हे नऊ भावंडांपैकी सर्वात लहान आहेत. त्यांचे वडील हे बंदरावर कामगार होते तर आई एका छोट्या दुकानामध्ये काम करायची.
-
मायदेशी म्हणजेच सूरीनाममध्ये परतल्यानंतर संतोखी यांनी वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजेच १९८२ साली पोलीस खात्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली. संतोखी हे १९८९ साली राष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी तपास विभागाचे प्रमुख झाले. त्यानंतर १९९१ साली संतोखी हे पोलीस दलाचे प्रमुख झाले.
-
२००५ ते २०१० या कालावधीमध्ये संतोखी यांनी देशाचे कायदामंत्री म्हणून काम पाहिलं. संतोखी कायदामंत्री असताने अनेक बड्या गुन्हेगारांना अटक करण्यात, देशातील अंमली पदार्थांचे रॅकेट उद्धवस्त करण्यात यंत्रणांना मोठं यश आलं. यामुळेच त्यांना शेरीफ हे टोपणनाव पडलं.
-
हलीमह याकोब- हे नावही भारतीयांना फारसं ठाऊक नाही. मात्र हलीमह या एका देशाच्या पंतप्रधान आहेत.
-
हलीमह याकोब या सिंगापूरच्या पंतप्रधान असून भारतीय वंशाच्या आहेत.
-
२०१७ पासून हलीमह याकोब सिंगापूरचं नेतृत्व करत असून त्या देशातील आठव्या पंतप्रधान आहेत.
-
हलीमह याकोब सिंगापूरच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
-
हलीमह याकोब यांचे वडील वॉचमन होते. १९६२ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
-
वडीलांचे निधन झाले तेव्हा हलीमह या केवळ आठ वर्षांच्या होत्या. त्यांचा पहिल्या महिला पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास फार संघर्षमय आहे.
-
अँटोनियो कोस्टा- पोर्तुगालचे सध्याच्या पंतप्रधानांचं नाव आहे अँटोनियो कोस्टा.
-
नुकतीच अँटोनियो कोस्टा यांनी २०२२ मध्ये पोर्तुगालमध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक जिंकली.
-
अँटोनियो कोस्टा हे या विजयासहीत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.
-
अँटोनियो कोस्टा हे पोर्तुगालमधील प्रमुख नेतृत्व असून त्यांचे वंशज गोव्याचे आहेत.
-
अँटोनियो कोस्टा यांचे आजोबा गोव्याचे होते. अँटोनियो कोस्टा यांचे वडील ओरलॅण्डो यांचे वडील गोव्याचे होते तर आई मोझॅम्बीक-फ्रेंच राष्ट्रीयत्व असणाऱ्या होत्या.
-
अँटोनियो कोस्टा यांचे वडील ओरलॅण्डो यांचा जन्म १९२९ साली झाल होता. त्यांचा मृत्यू २००६ साली झाला.
-
अरफान अली – मोहम्मद अरफान अली हे नावही आपल्यापैकी फारच कमी लोकांनी ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र भारतीय वंशांची ही व्यक्ती दक्षिण अमेरिकेतील एका देशाचे राष्ट्राध्यक्ष पद भूषवते.
-
२ ऑगस्ट २०२० साली अरफान अली यांनी गयानाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
-
अरफान अली यांचा जन्म २५ ऑगस्ट १९८० रोजी गयानामधील एका भारतीय-गयानीज मुस्लीम कुटुंबामध्ये झाला.
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य