-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबियांसह सागर या मुंबईतील निवासस्थानी यंदाची दिवाळी साजरी केली.
-
त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
-
दिवाळीसाठी अमृता यांनी लाल रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला होता.
-
यंदाच्या दिवाळीत अमृता मुलगी दिविजासह ट्विनिंग करताना दिसून आल्या.
-
देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा.
-
अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांसह सागर या निवासस्थानी लक्ष्मीपूजनही केले.
-
अमृता या उत्तम गायिकाही आहेत. यंदाच्या दिवाळीत त्यांच्या आवाजातील ‘लक्ष्मी आरती’ हे गाण्याची खास भेट त्यांनी चाहत्यांना दिली.
-
अमृता अनेक कार्यक्रमानांही उपस्थित राहत असतात. त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
आपली मते अमृता परखडपणे सोशल मीडियावरुन व्यक्त करताना दिसतात.
-
नुकतंच त्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली. ‘बिग बॉस’ घरातील दिवाळी सेलिब्रेशनमध्ये त्यांनी गाणं गाऊन चार चांद लावले.
-
(सर्व फोटो : अमृता फडणवीस/ इन्स्टाग्राम)

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?