-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या पेशाने बॅंकर असून उत्तम गायिकाही आहेत.
-
नुकतंच त्यांनी अतिशय वादग्रस्त पण लोकप्रिय असलेल्या छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये हजेरी लावली.
-
‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या पर्वाच्या पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना ‘बिग बॉस’कडून आश्चर्याचे धक्के मिळत आहेत.
-
अमृता फडणवीसांना ‘बिग बॉस’च्या घरात पाहून स्पर्धक आश्चर्यचकित झाले.
-
‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांनी अमृता फडणवीस यांच्यासाठी नृत्याची मेजवानी सादर केली.
-
अमृता फडणवीसांनी अक्षय केळकर, अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांच्यासह ‘कजरा रे’ गाण्यावर ठेका धरला.
-
आपल्या मधुर आवाजात गाणी गाऊन अमृता यांनी ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचे मनोरंजनही केले.
-
‘बिग बॉस’च्या घरातील किरण माने व यशश्री मसुरकर या सदस्यांनी अमृता फडणवीसांची मुलाखत घेत त्यांना बोलकं केलं.
-
अमृता यांनीही कोणतेही आडपडदे न ठेवता खुमासदार उत्तरे देत मुलाखत मनोरंजक केली.
-
या मुलाखतीत त्यांना “महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील तुमच्या मते टॉप पाच नेते कोण?”, असा प्रश्न विचारण्यात आला.
-
यावर उत्तर देत त“राजकारणात डॅशिंग लोक पाहिजेत. जे कधीही काहीही बोलू शकतात. ज्यांच्या बोलण्यामुळे वातावरण तापू शकतं. किंवा मजेशीर लोक पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.
-
अमृता फडणवीसांनी राज्यातील टॉप पाच नेत्यांची नावे सांगताना पहिलं नाव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं घेतलं.
-
नंतर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचं नाव अमृता फडणवीसांनी घेतलं.
-
अमृता फडणवीसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही नाव घेतलं.
-
त्यांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला खासदार सुप्रिया सुळेंचं त्यांनी नाव घेतलं.
-
पाचवं आणि शेवटचं नाव त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आमदार शहाजी बापू पाटील यांचं घेतलं.
-
शहाजी बापू पाटील यांचं नाव घेताच घरातील सदस्यांनी त्यांचा फेमस “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये हाय सगळं” हा डायलॉग म्हणत कार्यक्रमात रंगत आणली.
-
विशेष म्हणजे राज्यातील टॉप पाच नेत्यांच्या अमृता फडणवीसांच्या यादीत भाजपातील एकही नेत्याचं नाव नव्हतं.
-
(सर्व फोटो : कलर्स मराठी, अमृता फडणवीस/ सोशल मीडिया)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…