-
चीनमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे करोना साथीवर नियंत्रण आणण्यासाठी चीनमधील वुहानपासून पूर्व किनारपट्टीवरील चीनच्या औद्योगिक पट्ट्यापर्यंत नव्यानं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. (AP photo)
-
चीनमध्ये गुरुवारी १३२१ नवीन करोना रुग्ण आढळली आहेत. हा आकडा मागील दोन आठवड्यांतील सर्वाधिक आहे. (AP photo)
-
खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि हॉटेल्स बंद करण्यात आली आहेत. (AP photo)
-
त्याचबरोबर नागरिकांना मास्क परिधान करण्यात येत असून नागरिकांची तपासणी केली जात आहे. (AP photo)
-
चीनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग ‘झिरो कोविड’साठी कठोर निर्णय घेतील, अशी गुंतवणूकदारांना आशा होती. पण चीनमध्ये करोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. (Reuters Photo)
-
करोना लॉकडाऊन लादल्यानंतर, काही दिवसच निर्बंध असतील, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. मात्र, त्यानंतर सातत्याने लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. (Reuters Photo)
-
चीन अजूनही ‘झिरो कोविड’ धोरणापासून मागे हटण्याची चिन्हे दर्शविली नाहीत. (Reuters Photo)
-
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत ९० टक्के चिनी नागरिकांचं करोना लसीकरण पूर्ण झालं होतं. तर ५७ टक्के लोकांनी बूस्टर डोसही घेतला होता. (Reuters Photo)
-
चीनमध्ये देशांतर्गत विकसित लशींचा वापर केला जात आहे. या लशी फारशा प्रभावी नसल्याचं यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा