-
गुजरातमधील मोरबी याठिकाणी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील मच्छु नदीवरील झुलता पूल पाण्यात कोसळला आहे.
-
या दुर्घटनेत आतापर्यंत जवळपास ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेकजण जखमी झाल्याचं स्थानिक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
-
ही दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत.
-
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दलाने आतापर्यंत सुमारे ७० हून अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढलं आहे.
-
संबंधित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती.
-
घटनास्थळी उपस्थित असणारे राज्याचे पंचायत मंत्री ब्रिजेश मेरजा यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये रविवारी संध्याकाळी पावणे सात वाजता मोरबी येथील झुलता पूल नदीत कोसळून ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
-
सध्या १७ लोक रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अशी माहितीही त्यांनी दिली.
-
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
-
अलीकडेच या दुर्दैवी घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, हा आकडा वाढला असून मृतांची संख्या ६० वर पोहोचली आहे.
-
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-
पूल तुटण्याचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी, पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. संबंधित लोकं सुट्टीचा दिवस साजरा करण्यासाठी या पुलावर जमले होते. मच्छु नदीवरील हा झुलता पूल अनेकांसाठी पर्यटन केंद्र बनलं आहे.
-
गुजरात सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. (सर्व फोटो सौजन्य- एएनआय)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…