-
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुलीचा धिप्पाड वाघ. ज्याचा इतिहास कुणाला ठाऊक नाही. तो कुठून आला हे पर्यटकांसाठीच नव्हे तर वनखात्याच्या अधिकाऱ्यांसाठी देखील एक रहस्य आहे आणि म्हणूनच तो ‘मिस्ट्री मेल’ या नावाने ओळखला जात होता.
-
त्याचा इतिहास जसा कुणाला ठाऊक नव्हता तसेच त्याचे अपघाती ‘एक्झिट’ घेणे देखील न पचणारे. सहजासहजी तो कुणालाही दिसत नव्हता, पण चोरबाहुली या त्याच्या अधिवासात तो दिसला की पर्यटकांसाठी पर्वणीच ठरायचा.
-
तुरीया गेटपासून काही अंतरावर चोरबाहुलीत त्याचे जगणे म्हणजे एखाद्या राजासारखे होते.
-
एखाद्या सम्राटप्रमाणे त्याची चाल होती. तो रस्त्यावर यायचा तेव्हा काही क्षण थांबायचा.
-
पर्यटकांच्या वाहनांकडे गुर्रावल्यासारखे बघायचा आणि रस्ता पार करत निघून जायचा.
-
पर्यटकांच्या वाहनांनी त्याला घेरले तर मात्र तो आक्रमक पावित्रा घ्यायचा. त्याच्या शेपटीच्या हालचालीवरून ते कळायचे.
-
जानेवारी २०२२ मध्ये तो राष्ट्रीय महामार्ग ४४ वर वाहनाच्या धडकेत जखमी झाला. त्या मार्गावरून जाणारे कुटुंब त्याठिकाणी थांबले तेव्हा या जखमी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.
-
नंतर त्याला बेशुद्ध करून ट्रान्झिट ट्रीटमेंट केंद्रात व नंतर गोरेवाडा बचाव केंद्रात उपचारासाठी आणले, पण त्याची मृत्यूशी चाललेली झुंज फार काळ टिकू शकली नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
-
सर्व छायाचित्रे – व्यंकटेश मुदलियार (हेही पाहा : उमरेड कऱ्हाडला अभयारण्यातील शक्तीशाली ‘बाहू’ वाघ)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा