-
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा २ नोव्हेंबरला करण्यात आली.
-
या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते.
-
या सोहळ्यात चित्रपटातील कलाकरांच्या फर्स्ट लूकची झलकही पाहायला मिळाली.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
-
तर ‘बिग बॉस’ फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशीही झळकणार आहेत.
-
महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.
-
सोहळ्यातील एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
-
या सोहळ्यात एकनाथ शिंदे “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा योग वारंवार जुळून येत आहे. गेल्या १० वर्षाचा बॅकलॉग भरुन निघत आहे”, असं म्हणाले.
-
राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीवरून मुख्यमंत्र्यांचा उल्लेख “वेडात वीर मराठे दौडले चाळीसचे निर्माते, दिग्दर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे”, असा केला.
-
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. -
(सर्व फोटो : एकनाथ शिंदे/ इन्स्टाग्राम)
Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”