-
Worlds longest passenger train:
जगातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गावर जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन धावत आहे. -
आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या
स्वित्झरलॅंडने जगातील सर्वात लांबलचक पॅंसेजर ट्रेन असल्याचा दावा केला आहे. -
स्विस रेल्वेशी संलग्न असलेल्या राएटियन रेल्वे कंपनीने १०० डबे असलेली सुमारे २ किमी लांबीची ट्रेन चालवली. या यशाचे श्रेय स्वित्झरलॅंडमध्ये उत्कृष्ट काम करणा-या राएटियन रेल्वेला (RhB) जाते.
-
युरो न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार या विक्रमाची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे. स्विस रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करून तुम्ही जगातील सर्वात सुंदर रेल्वे मार्गाचा आनंदही घेऊ शकता.
-
जगातील सर्वात लांब ट्रेनचा किताब
स्वित्झरलॅंडला मिळाला आहे. या ट्रेनची क्षमता ४५५० आसनांची आहे, जी एकाच वेळी ७ चालक उत्तम क्वार्डिनेशन चालवतात. -
या यशामुळे स्वित्झरलॅंड आता जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन चालवणारा देश बनला आहे.
-
स्विस रेल्वेशी संलग्न असलेल्या राएटियन रेल्वे कंपनीने १०० कोच असलेली सुमारे २ किलोमीटर लांब (१.२ मैल लांब) ट्रेन चालवली.
-
स्विस रेल्वेच्या १७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रॅटियन रेल्वेने हा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला असला, तरी या रेल्वे प्रवासातून स्वित्झरलॅंडच्या सुंदर रेल्वे मार्गाचे सौंदर्य जगाला दाखवायचे आहे.
-
The Rhaetian रेल्वे RhB कंपनीने बनवलेली ही ट्रेन २२ बोगदे आणि ४८ पुलांमधून गेली. ही ट्रेन युनेस्कोच्या जागतिक वारसा अल्बुला/बर्निना मार्गावर धावली.
-
२००८ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे. या सुंदर मार्गाची चर्चा जगभरात आहे.
-
रेल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, करोना महामारीच्या काळात या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या सर्व सेवांच्या कामकाजावर वाईट परिणाम झाला होता.
ज्याचा रेल्वेच्या कमाईवरही वाईट परिणाम झाला. -
कंपनीला आशा आहे की या ट्रेनमुळे जगभरातील पर्यटक पुन्हा एकदा या मार्गावरील ट्रेन प्रवासाचा आनंद घेण्यासाठी परततील. (ALL Photos : http://www.rhb.ch)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”