-
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये हजेरी लावली.
-
या कार्यक्रमातील मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
-
नितीन गडकरींनी मुलाखतीत मुंबईतील स्ट्रीट फूडबद्दलचा किस्साही सांगितला.
-
गडकरी हे खवय्ये आहेत. याआधीही अनेक मुलाखतींमधून त्यांनी मुंबई आणि तेथील रस्त्यांवर मिळणाऱ्या स्ट्रीट फूडबद्दल असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त केलं आहे.
-
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीतही पुन्हा एकदा त्यांनी मुंबईतील खाद्यपदार्थांबद्दल भाष्य केलं.
-
ते म्हणाले, “मुंबईत चांगले खाद्य पदार्थ हे रस्त्यावरच मिळतात. मुंबईसारखं स्ट्रीट फूड संपूर्ण जगात कुठेच मिळत नाही. मुंबईतील स्ट्रीट फूडचा दर्जाही उत्तम आहे”.
-
यावेळी मित्रांबरोबरचा एक किस्साही नितीन गडकरी यांनी सांगितला.
-
“माझ्याबरोबर झेड प्लस सिक्युरीटी असते. ५० पोलिसांबरोबर फुटपाथवर गेलो तर ते रस्ता बंद करतील”, असं त्यांनी सांगितलं.
-
पुढे ते म्हणाले, “त्यामुळे झोपायला जात आहे असं सांगून माझ्या सुरक्षारंक्षकांना मी घरी पाठवतो. त्यानंतर मी माझ्या मित्रांबरोबर मुंबईतील फुटपाथवरील पदार्थांचा आस्वाद घेतो”.
-
मुंबईत आल्यानंतर गडकरी त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागीच जेवण करतात.
-
मुलाखतीदरम्यान याबद्दलही त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
-
तेव्हा त्यांनी “हो हे खरं आहे. पण मी ठिकाणाचं नाव सांगणार नाही”, असं मजेशीर उत्तर दिलं.
-
यावरुन नितीन गडकरींना मुंबईतील स्ट्रीट फूड किती आवडतं, हे दिसून येते.
-
(सर्व फोटो : नितीन गडकरी/ फेसबुक)
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…