-
दीपाली सय्यद यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला असून राज्यातील राजकीय वर्तुळातही याची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
-
दीपाली सय्यद यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला होता.
-
त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
-
राज्यातील राजकीय परिस्थिती आणि समाजातील इतर गोष्टींवरही त्या अनेकदा त्यांचं मत परखडपणे मांडताना दिसतात.
-
राजकीय नेत्यासह त्या एक उत्तम अभिनेत्रीही आहेत.
-
‘मुंबईचा डबेवाला’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘होऊन जाऊ दे’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.
-
त्यांनी सायन्स विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून नालंदा विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे.
-
शिंदे गटात प्रवेश करणार असल्यामुळे दीपाली सय्यद पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
-
याच निमित्ताने त्यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.
-
२०१८-१९ वर्षादरम्यान दीपाली सय्यद यांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांहून अधिक होते. तर त्यांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न ११ लाख ५१ हजार इतके होते.
-
दीपाली सय्यद यांनी एलआयसीमध्ये ५७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
-
दीपाली सय्यद यांच्या नावे फॉर्च्युनर, होंडा तर त्यांच्या पतीच्या नावे यमाहा आरएक्स, सुझुकी या गाड्यांची नोंद आहे.
-
दीपाली सय्यद आणि त्यांच्या पतीकडे ६० तोळे सोन्याचे दागिने आहेत.
-
यापैकी दीपाली यांच्या नावे ४० तोळ्याच्या स्त्रीधनाची तर त्यांच्या पतीच्या नावे २० तोळे सोन्याच्या दागिन्यांची नोंद आहे.
-
अंधेरी येथील म्हाडाच्या इमारतीत दीपाली सय्यद यांच्या नावे फ्लॅट आहे.
-
हा फ्लॅट त्यांनी २००९ साली खरेदी केला होता. आज या फ्लॅटची किंमत सुमारे दोन कोटींच्या घरात आहे.
-
तर पश्चिम अंधेरीमध्ये त्यांच्या पतीच्या नावावरही एका फ्लॅटची नोंद आहे.
-
त्यांनी बॅंकमधून सुमारे ३२ लाखांचे कर्ज घेतले आहे.
-
२०१९च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान निवडणूक आयोगाला पुरविलेल्या माहितीनुसार दिपाली सय्यद एकूण चार कोटींहून अधिक संपत्तीच्या मालक आहेत.
-
(सर्व फोटो : दीपाली सय्यद/ फेसबूक)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल