-
‘ती’ जेवढी संवेदनशील, तेवढीच आक्रमकसुद्धा. बछड्यांसोबत तिचे जेवढे संवेदनशील प्रसंग पर्यटकांनी अनुभवले आहेत, तेवढाच पर्यटकांचा अति त्रास झाल्यानंतर तिचे रौद्र रुप देखील अनुभवले आहे.
-
इतर वाघांमुळे तिच्या बछड्यांना धोका असल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच त्यांच्या संरक्षणसाठी तिने या वाघांसोबत मिलन करुन बछड्यांचे जगणे सुरक्षित केले आहे.
-
ही तिच ‘माया’ आहे, जी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची ‘क्वीन’ म्हणूनही ओळखली जाते.
-
अलीकडेच तिने पुन्हा एकदा बछड्यांना जन्म दिलाय आणि या नव्या पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या व्याघ्रप्रकल्पाकडे वळत आहेत.
-
बछड्यांवर माया करणारी ‘माया’ दिसताच कॅमेऱ्याच्या बटणा पटापट दाबल्या जातात आणि त्यामुळे विचलीत झालेली ही वाघीण बछड्यांना घेऊन पुन्हा जंगलात खोल आत जाते.
-
बछड्यांच्या सुरक्षेसाठी तिचे इतर वाघांशी जुळवून घेणे पर्यटकांना थोडे वेगळे वाटत असले तरीही ती शेवटी आई आहे.
-
तिचा आणि बछड्यांचा जीव धोक्यात असल्याचे लक्षात येताच ‘मटकासूर’, ‘गब्बर’ या वाघांशी मिलनासाठी तयार झाली आणि बछड्यांचा जीव तीने वाचवला.
-
या व्याघ्रप्रकल्पातील पांढरपवनी म्हणजे तिचा हक्काचा अधिवास.
-
सर्व छायाचित्रे – युवराज पाटील (हेही पाहा : चर्चेतला वाघ – राजाप्रमाणे जगलेला ‘मिस्ट्री मेल’)
Pune Swargate Rape Case Live Updates : पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन मंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय; म्हणाले, “१५ एप्रिलपर्यंत…”