-
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी वेग धरलाय.
-
अशातच दोघांच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे, असा दावा शोएबच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे.
-
परंतु सानिया किंवा शोएबने यासंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नाही.
-
सानिया व शोएबच्या लग्नाला १२ वर्ष झाली आहेत. दोघांनी प्रेम विवाह केला होता. त्यांच्या लव्ह स्टोरीचीही चांगलीच चर्चा झाली होती.
-
सानियाने तिच्या आत्मचरित्रात शोएबशी तिची पहिली भेट कशी झाली याचा उल्लेख केला आहे.
-
सानिया सोहराबशी लग्न करणार होती, पण साखरपुड्यानंतर त्यांचं नातं तुटलं.
-
याच काळात तिची शोएबशी पहिली भेट झाली होती. त्यावेळी सानिया मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर टेनिसमध्ये परतण्याचा प्रयत्न करत होती आणि तिचा फॉर्मही घसरला होता.
-
त्यावेळी शोएब मलिकदेखील पाकिस्तानी संघाबाहेर होता. तेव्हा सानिया पहिल्यांदा शोएबला ऑस्ट्रेलियात भेटली होती.
-
दोघेही २००३ मध्ये पहिल्यांदा भेटले होते, मात्र तेव्हा सानियाला शोएब फारसा आवडला नसल्याने तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
-
सानियाला वाटायचं की क्रिकेटपटूंचा स्वभाव चांगला नसतो, त्यामुळे तिने स्वत:ला त्यांच्यापासून ठेवायचा निर्णय घेतलेला.
-
पुढे २००९ मध्ये सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. दोघेही ऑस्ट्रेलियाच्या होबार्टमध्ये भेटले होते. त्यावेळी शोएबने सानियाला तिचा फोन नंबर मागितला होता.
-
नंतर काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
-
१२ एप्रिल २०१० रोजी दोघांनीही हैदराबादमध्ये लग्न केलं.
-
त्यानंतर पाकिस्तानमध्ये त्यांचा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
-
सानिया आणि शोएबने लग्नाची घोषणा केल्यानंतर तो एक राष्ट्रीय आणि धार्मिक मुद्दा बनवत त्यांच्यावर टीकाही झाली.
-
कारण सानिया भारतीय होती, तर शोएब पाकिस्तानचा होता.
-
कालातंराने टीकेला पूर्णविराम मिळाला आणि सानिया-शोएबने आपापल्या खेळात पुनरागम केलं.
-
दोघेही २०१८ मध्ये पालक बनले, त्यांच्या मुलाचं नाव इझान आहे.
-
सानिया व शोएब मुलगा इझानसह अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावायचे.
-
परंतु मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यात सर्व आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
-
दोघेही एकत्र राहत नसून आता मात्र दोघांनीही कायदेशीररित्या घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचा दावा शोएबच्या जवळच्या व्यक्तीने केला आहे. (फोटो सौजन्य – शोएब मलिक इन्स्टाग्राम व सानिया मिर्झा फेसबूक)
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण