-
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.
-
शोएब व सानियाच्या विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी घटस्फोटासाठी अर्जदेखील केल्याचं बोललं जात आहे.
-
मुलगा इझानच्या वाढदिवसाचे फोटो सानियाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर न केल्याने ती शोएबपासून विभक्त होण्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
-
त्यानंतर सानियाने “तुटलेली हृदये कुठे जातात? अल्लाला शोधण्यासाठी.” अशी पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती.
-
सानियाच्या या स्टोरीमुळे शोएबपासून वेगळे होणाच्या चर्चांना उधाण आलं.
-
शोएबची एका पाकिस्तानी मॉडेलबरोबर वाढलेली जवळीक त्यांच्या घटस्फोटाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
-
शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा उमरसह जोडलं जात आहे.
-
आयेशा उमर आणि शोएब मलिकचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
आयेशा आणि शोएबच्या या स्विमिंगपूलमधील फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
आयेशा ही अभिनेत्री आणि मॉडेलसह एक युट्यूबरही आहे.
-
पाकिस्तानमध्ये ती स्टाइल आयकॉन म्हणूनही प्रसिद्ध आहे.
-
आयेशा क्रिकेटची चाहती असून अनेकदा ती पाकिस्तानी क्रिकेट टीमला मॅचदरम्यान स्टेडिअममध्ये प्रोत्साहन देतानाही दिसली आहे.
-
पाकिस्तानी मीडियानुसार, शोएब आणि आयेशा हे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत.
-
२०२१मध्ये त्यांनी ओके या पाकिस्तानी मॅगझीनसाठी फोटोशूट केले होते. त्याच दरम्यानचे हे फोटो आहेत.
-
परंतु, शोएबचं आयेशासह अफेअर असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
-
सानिया मिर्झा व शोएब मलिकने २०१० साली लग्नबंधनात अडकले होते. १२ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
-
(सर्व फोटो : आयेशा ओमर, सानिया मिर्झा/ इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख