-
भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं आहे.
-
गुजरातमधील उत्तर जामनगर भागातून रिवाबा जडेजा निवडणूक लढवणार आहे.
-
भाजपाने विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा जडेजा चर्चेत आले आहेत.
-
रिवाबा जडेजा मुळची गुजरातमधील राजकोट येथील रहिवाशी आहे.
-
तिचे वडील हरदेव सोलंकी हे एक प्रसिद्ध व्यायसायिक आहेत.
-
रवींद्र जडेजाशी विवाह होण्याआधी ती रिवा सोलंकी या नावाने ओळखली जायची.
-
रिवाबाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून आधीपासूनच ती सामाजिक कार्यात सक्रिय राहिलेली आहे.
-
२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तिने भाजपामध्ये प्रवेश केला होता.
-
त्याआधी रिवाबा राजपूत गटाच्या करणी सेनात सक्रिय होती.
-
कॉंग्रेस नेते हरि सिंह सोलंकी यांची रिवाबा पुतणी आहे.
-
राजकोटमध्ये जडेजा कुटुंबियांचे ‘जड्डूस फूड फिल्ड’ नावाचे रेस्टॉरंट आहे.
-
रिबावा आणि रवींद्र जडेजा यांनी १७ एप्रिल २०१६ साली लग्नगाठ बांधली.
-
त्यांना निधायना ही मुलगी आहे.
-
रिवाबा जडेजाने भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी “रिवाबा गुजरातच्या ओळखीचा चेहरा आहे. भाजपाला याचा नक्कीच फायदा होईल”, असं वक्तव्य केलं होतं.
-
१ व ५ डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबर या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
-
या निवडणुकीत रिवाबा जडेजा भरघोस मतांनी निवडूण येणार असल्याच्या अपेक्षा पक्षाला आहेत.
-
(सर्व फोटो : रिवाबा जडेजा/ फेसबूक)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख