-
वसईतील २६ वर्षीय तरुणी श्रद्धा वालकर हिचा तिचा प्रियकर अफताफ पूनावाला याने दिल्लीत निर्घृण खून केला आहे.
-
खून केल्यानंतर नराधम प्रियकराने तिच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले होते. (Express Photo by Amit Chakravarty)
-
आरोपीने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. ही धक्कादायक घटना सहा महिन्यानंतर उघडकीस आली आहे. (Express Photo by Amit Chakravarty)
-
खूनाची बातमी समोर आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी मुंबईतील घाटकोपर येथे आंदोलन करण्यात आलं आहे. (Express Photo by Amit Chakravarty)
-
श्रद्धाचा खून हा लव्ह जिहादचा प्रकार आहे का? याचा तपास करण्याची मागणी भाजपा नेते राम कदम यांनी फलकाद्वारे केली आहे. (Express Photo by Amit Chakravarty)
-
श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी राम कदमांच्या नेतृत्वाखाली अनेक महिला आणि पुरुषांनी एकत्र येत आंदोलन केलं आहे. (Express Photo by Amit Chakravarty)
-
यावेळी महिलांनी आरोपी प्रियकर अफताफ पूनावाला याचा पुतळा तयार करून त्याला चपलेनं मारहाण केली. (Express Photo by Amit Chakravarty)
-
मृत श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने आरोपीनं तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. दररोज रात्री मृतदेहाचे काही तुकडे घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात फेकत असे. (Express Photo by Amit Chakravarty)
-
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे साठवून ठेवण्यासाठी अफताफने ३०० लिटरचा फ्रीज खरेदी केला होता. तसेच मृतदेहाची दुर्गंधी कमी करण्यासाठी तो घरात अगरबत्ती आणि रुम फ्रेशनरचा वापर करत असे.
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन