-
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा प्रियकराने दिल्लीत खून केल्याच्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
-
आफताब अमीन पूनावाला या २८ वर्षीय तरुणाने श्रद्धाचा गळा दाबून तिचा खून केला.
-
त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. फ्रिजमध्ये हे शरीराचे तुकडे ठेवून दिल्लीतील वेगवेगळ्या भागात ते फेकून त्याची विल्हेवाट लावण्याचा कट त्याने रचला होता.
-
हत्याकांड झाल्यानंतर सहा महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी आफताबला ताब्यात घेतले आहे.
-
आफताब व श्रद्धा यांची कॉलसेंटरमध्ये भेट झाली होती. २०१८पासून ते रिलेशनशिपमध्ये होते.
-
श्रद्धाच्या घरच्यांना हे आफताबसह असलेले तिचे संबंध मान्य नसल्यामुळे २०१९मध्ये त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती.
-
२०२२मध्ये कामानिमित्त आफताब व श्रद्धा दिल्ली येथे राहण्यास गेले होते. तेव्हापासून श्रद्धाच्या घरच्यांशी तिचे संपर्क तुटले होते.
-
आफताबला भेटल्यापासून श्रद्धा बदलली होती. ती वेगळं वागायला लागली होती, असं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
-
अमेरिकन क्राइम सीरिज डेक्सटर पाहून श्रद्धाचा खून करण्याची कल्पना सुचली असल्याचं आफताबने पोलिसांनी केलेल्या चौकशीत कबूल केलं आहे.
-
लग्नाचा तगादा लावल्याने श्रद्धाचा खून केल्याचं आफताबने उघड केलं आहे.
-
या घटनेबद्दल देशभरातून संताप व्यक्त होत असून आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
-
प्रेयसीचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणारा आफताब हादेखील वसईतील रहिवाशी आहे. त्याचे वडील चपला विकण्याचा व्यवसाय करतात.
-
वसईतील ‘सेंट फ्रान्सिस हायस्कूल’मध्ये त्याने प्राथमिक शिक्षण घेतलं असून मुंबईतील ‘रहेजा कॉलेज’मधून बीएमएसची पदवी संपादन केली आहे.
-
आफताब हा एक फूड ब्लॉगरही आहे. ‘हंग्री चोक्रो’ या नावाने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे.
-
श्रद्धाच्या मृत्यूनंतर आफताब डेटिंग अपवर सक्रिय होता. त्यानंतरही तो अनेक मुलींना डेट करत असल्याची माहितीही समोर आली आहे.
-
श्रद्धाचा मृतदेह फ्रिजमध्ये असतानाही तो मुलींना घरी घेऊन येत असल्याचं तपासात उघड झालं आहे.
-
(सर्व फोटो : सोशल मीडिया, एएनआय)

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…