-
वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
-
श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता.
-
या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु झाला असून आज पोलीस त्याला मेहरोलीच्या जंगलात घेऊन गेले होते.
-
त्याने प्रत्यक्षात कुठे त्याने मृतदेहाचे तुकडे फेकले आहेत यासंदर्भातील तपासणी पोलिसांनी केली.
-
श्रद्धाची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताबने ते दोघेही राहत असलेल्या घरातच ठेवले होते.
-
श्रद्धा आणि आफताब हे दिल्लीतील छत्तरपूर परिसरातील भाड्याच्या घरात राहत होते.
-
त्यांचे हे घर पहिल्या मजल्यावर होते.
-
त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा गेले अनेक दिवस दिसत नव्हती. हे कृत्य नेमकं कधी घडलं याबद्दल कोणाला काहीही थांगपत्ता नव्हता.
-
दिल्लीतील राहत्या भाड्याच्या घरातच आफताबने श्रद्धाची हत्या केली.
-
त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता.
-
घरातील मृतदेहाचा आणि रक्ताचा वास सर्वत्र पसरु नये यासाठी तो उदबत्ती, सेंटेट कँडल, सुगंधित फुलं यांचा वापर केला होता.
-
यातील बहुतांश वस्तू आजही जागच्या जागी तशाच पाहायला मिळत आहे. (एक्सप्रेस फोटो – जिग्नेश सिन्हा)
आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना