-
Shraddha Murder Case: दिल्लीतील श्रध्दा मर्डर अपडेट्समध्ये घडलेला खुलासा ऐकून सगळेच हैराण झाले आहेत.
-
श्रद्धाचा प्रियकर आफताब याने आधी तिचा गळा आवळून खून केला आणि नंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रिजमध्ये ३ महिने ठेवले.
-
हे तुकडे त्याने शहरातील वेगवेगळ्या भागात टाकून दिले. आफताब पूनावालाने पोलिसांना सांगितले की, डेक्सटर नावाची वेब सीरिज पाहिल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना त्याला आली.
-
या घटनेच्या ५ महिन्यानंतर खुनी आफताब याला १४ नोव्हेंबरला अटक करण्यात आली.
-
ही भीषण हत्या आपल्याला काही चित्रपटांची आठवण करून देईल, ज्यामध्ये देखील अशीच कृत्ये दाखवण्यात आली होती.
-
अंधाधुन हा चित्रपट हा अलीकडच्या काळातील सर्वोत्कृष्ट थ्रिलर चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. चित्रपटात आपल्याला एक खून होताना दिसतो, हा चित्रपटाचा टर्निंग पॉइंट आहे. प्रमोदची भूमिका करणाऱ्या अनिल धवनला त्याच्या पत्नीचे पोलिस कर्मचाऱ्याशी अफेअर असल्याचे पाहून धक्काच बसतो. त्यानंतर हे दोघे मिळून प्रमोदची हत्या करतात आणि त्याचा मृतदेह जमिनीवर पडलेला असतो. त्याचवेळी त्यांच्या घरात प्रवेश करणारा आयुष्मान खुरानाचे पात्र, ज्याला ते आंधळा समजतात त्याच्या समोर हे प्रकरण घडते. त्यानंतर दोघे मिळून मृतदेह सुटकेस मध्ये कशा पद्धतीने भरतात आणि कशी त्याची विल्हेवाट लावतात याचा साक्षीदार आयुष्यमान खुराणा बनतो.
-
100 days या चित्रपटात माधुरी दीक्षित एक पात्र साकारत आहे ज्यामध्ये तिला भविष्यात किंवा आधी घडलेल्या गोष्टी दिसत असतात. तिच्याकडे एक प्रकारची व्हिजन पॉवर दाखवण्यात आली आहे. या व्हिजन पॉवरमुळे तिला तिच्या बहिणीच्या मृत्यूमागचे रहस्य कळते आणि तिच्याच घरात लपवून ठेवलेला तिच्या बहिणीचा मृतदेह देखील सापडतो. आश्चर्यची गोष्ट म्हणजे तिला आपल्या बहिनीचा खूनी तिचाच नवरा असल्याचे कळते.
-
बाजीगर बाजीगर चित्रपटात शाहरुख खानचे पात्र शिल्पा शेट्टीच्या पात्राला प्रेमाच्या जाळ्यात फसवून टेरेसवरून खाली फेकून देतो. हे सर्व तो तिच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी करत असल्याचे दाखवले आहे. त्यानंतर तिच्या मर्डरला आत्महत्येचे स्वरूप देतो आणि त्यानंतर कशा प्रकारे तिच्या शरीराची विल्हेवाट लावतो ते यात दाखवले आहे.
-
सात खून माफ सात खून माफ या चित्रपटात सुझैनचे पात्र साकारणारी प्रियांका चोप्रा आपल्या सात पतींना एक एक करून कशाप्रकारे मारते हे दाखवण्यात आले आहे. ती प्रत्येक पतीचा खून अतिशय निर्घृण पद्धतीने करते. या चित्रपटात ती आपल्या प्रत्येक पतीचा खून कशा पद्धतीने मारले ते दाखवण्यात आलं आहे.(photo: social media)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…