-
Ravindra Jadeja Wife Property: भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे.
-
रिवाबा एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व व्यवसायिक आहेत. रिवाबा फूड बिझनेसमध्येही अग्रेसर आहेत व त्यांचे स्वतःचे हॉटेल आहे.
-
हॉटेल व्यवसायात असणाऱ्या रिवाबा जडेजाच्या संपत्तीचे आकडे ऐकून भल्याभल्यांना घाम फुटेल.
-
३२ वर्षीय रिवाबा जडेजा यांनी जीटीयू अहमदाबाद येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. २०१६ मध्ये रिवाबा व रविंद्र यांनी लग्न केले होते.
-
उमेदवारी दाखल करताना रिवाबाच्या कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला. यात दागदागिने, घर, गाडी, व अन्य गुंतवणुकीचा समावेश आहे.
-
रविंद्र व रिवाबा या दोघांकडे एकूण ९७.३५ कोटी किमतीची एकत्रित संपत्ती आहे.
-
यातील ७० कोटी ४८ लाख रुपयांची प्रॉपर्टी ही रविंद्र जडेजाच्या नावे आहे तर ६४.३ कोटीची संपत्ती रिवाबा जडेजा यांच्या नावे आहे.
-
रिवाबा व रविंद्र यांच्याकडे अनुक्रमे ५७.६० व ३७.४७ कोटी किमतीची प्रॉपर्टी गुंतवणूक आहे.
-
रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबाकडे १ कोटी रुपयांचे दागिने आहेत, यात सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत.
-
रिवाबा जडेजा यांच्या नावे कोणतीही गाडी नाही मात्र रविंद्र जडेजाकडे तीन लक्जरी कार आहेत. यात फोक्सवॅगन पोलो जीटी, फोर्ड एन्डेव्हर व ऑडीचा समावेश आहे.
-
भाजप नेत्या रिवाबा जडेजा यांच्या नावे गुजरातच्या अहमदाबाद, राजकोट, जामनगर येथे एकूण ६ घरे व राजकोट व जामनगर येथील दुकानांचे गाळे आहेत.
-
रिवाबा जडेजा यांची जड्डू फूड फील्ड रेस्टॉरंटमध्ये ५०% भागीदारी आहे.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”