-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी मधू’ने कितीही तोरा दाखवला तरी पर्यटक कायम तो झेलण्यासाठी तयार असतात. किंबहूना पर्यटक तिच्या दर्शनासाठी आतुर असतात, असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.
-
हीच ‘छोटी मधू’ वाघीण पर्यटकांनी जास्त आक्रास्ताळेपणा केला, तर त्यांच्या अंगावर धावून जायलाही कमी करत नाही. या व्याघ्रप्रकल्पात अलीकडेच काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.
-
ताडोब्यातील आगरझरी बफर क्षेत्रात व्याघ्रदर्शनासाठी गेलेल्या नागपूरातील पर्यटकांच्या जिप्सीचा ‘छोटी मधू’ वाघिणीने पाठलाग केला.
-
वाघाला जवळून पाहण्यासाठी धडपडणाऱ्या पर्यटकांचा अति उत्साह त्यांच्याच अंगलट आला.
-
वाघ दिसताच पर्यटकांचा उत्साह उचंबळून आला आणि मग छायाचित्रासाठी धडपड सुरू झाली.
-
‘छोटी मधू’ला अक्षरश: पर्यटक वाहनांनी घेरले. शेवटी ती चवताळली आणि त्या पर्यटकांनी भरलेल्या वाहनांच्या मागे लागली.
-
घाबरलेले पर्यटक जोरजोरात ओरडायला लागले. ‘छोटी मधू’ने त्यांना चांगलाच धडा शिकवला.
-
कित्येकदा पर्यटकांना तिने केलेल्या शिकारीचा देखील तोरा दाखवला आहे. तर मोठ्या ऐटीत तीने कुटुंबासह पर्यटकांना दर्शन दिले आहे.
-
सर्व छायाचित्र – प्र. सु. हिरूरकर (हेही पाहा : बछड्यांवर अतोनात माया करणारी ताडोबाची ‘क्वीन’)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य