-
पालघर येथील २६ वर्षीय तरुणी श्रद्धा वालकरचा तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण खून केला आहे.
-
आरोपीनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे सुमारे ३५ तुकडे केले होते. ही बाब उघडकीस आल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
-
मृत श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्रद्धाचे जसे ३५ तुकडे करण्यात आले, तशीच शिक्षा आफताबलाही द्यावी, त्याचेही ३५ तुकडे करावेत, आफताबसाठी यापेक्षा कठोर शिक्षा असूच शकत नाही, अशी संतप्त भावना श्रद्धाच्या मित्राने व्यक्त केली.
-
माझ्या मैत्रिणीसोबत हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. याची माहिती मिळताच आम्हाला मोठा धक्का बसला. – रजत
-
ती बेपत्ता असल्याची माहिती आम्हाला मे महिन्यातच मिळाली होती, पण ती कुठेतरी फिरायला गेली असावी, असं आम्हाला वाटलं. -रजत
-
श्रद्धा खूप हुशार मुलगी होती, तिला उज्ज्वल भविष्य होतं- रजत
-
श्रद्धाला बोलायला खूप आवडायचं. ती हसती खेळती मुलगी होती, ती ‘जॉली’ स्वभावाची होती – रजत
-
या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही खूप दु:खी आहोत. दु:ख व्यक्त करायला माझ्याकडे शब्दही पुरेशे नाहीत. -रजत
-
माझी हात जोडून विनंती आहे, की हे प्रकरण लवकरात लवकर जलद गती न्यायालयात आणलं पाहिजे. तसेच याचा तपास सीबीआयकडून करावा.- रजत
-
आफताब कोण आहे? त्याला कुणाचा पाठिंबा आहे? तो कुणाशी जोडला गेला आहे? हे सर्व समोर येणं गरजेचं आहे.
-
त्याने आपल्या प्रेयसीचे ३५ तुकडे केले आहेत, ही बाब अशक्य वाटते. तो एखाद्या दहशतवादी किंवा धार्मिक मोहिमेशी जोडलेला असावा, अशी भीती मला वाटते- रजत
-
श्रद्धासोबत जे घडलं तेच आफतासोबत व्हायला पाहिजे, त्याचेही ३५ तुकडे करायला हवे, आफताफला यापेक्षा दुसरी कठोर शिक्षा असूच शकत नाही -रजत (मृत श्रद्धाचा मित्र) (सर्व फोटो सौजन्य-एएनआय व सोशल मीडियावरून साभार)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ