-
क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोलंकी उर्फ रिवाबा जडेजा सध्या चर्चेत आहे.
-
रिवाबा भाजपाच्या तिकिटावर गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, रवींद्र जडेजाही तिच्या प्रचारासाठी मैदानात उताराला आहे.
-
१ व ५ डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
-
या निवडणुकीत रिवाबा जडेजा भरघोस मतांनी निवडूण येईल अशी अपेक्षा भाजपाला आहे.
-
रिवाबा जडेजा मुळची गुजरातमधील राजकोट येथील रहिवाशी आहे.
-
रिवाबाने भाजपात प्रवेश केल्यानंतर, “रिवाबा गुजरातच्या ओळखीचा चेहरा आहे. भाजपाला याचा नक्कीच फायदा होईल”, असं वक्तव्य पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं होतं.
-
रिवाबाने २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला. आता भाजपने तिला गुजरातमधील जामनगर उत्तरमधून उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.
-
रिवाबाने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर ती खूप फॅशनेबलदेखील आहे. पण राजकारणात आल्यापासून ती अनेक प्रसंगी साडी नेसून दिसली आहे.
-
रिवाबाकडे साड्यांचे चांगले कलेक्शन आहे. इतकेच नाही तर प्रत्येक रंगाची साडी तिला शोभते.
-
२०१९ पूर्वीच्या अनेक फोटोमध्ये, रिवाबा बहुतेक वेळा वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसली होती. पण आता तिने आपला पेहराव बदलला आहे.
-
रिवाबाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गेल्या तीन वर्षांतील फोटोमध्ये ती बहुतेकवेळा साडीमध्येच पाहायला मिळेल.
-
लोकांशी संवाद साधताना आणि त्यांच्याबरोबर वावरताना ती साडीमध्येच दिसते.
-
रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी १७ एप्रिल २०१६ साली प्रेमविवाह केला.
-
रवींद्र जडेजाशी विवाह होण्याआधी ती रिवा सोलंकी या नावाने ओळखली जायची.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम – रवींद्र जडेजा आणि रिवाबा जडेजा
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO