-
सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. त्यामध्येच प्री वेडींग फोटोशूट हा विषय सध्या चर्चेत आहे. आपलेही सेलिब्रिटींप्रमाणे फोटोशूट व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, ही इच्छा लग्नसमारंभामध्ये पूर्ण केली जाते. त्यातही प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी वेगवेगळ्या थीम ठरवून शूट केले जाते.
-
तुम्हीदेखील प्री वेडिंग फोटोशूट करण्याचा विचार करत असाल तर एका चर्चेत असणाऱ्या हटके प्री वेडिंग फोटोशूटमधून तुम्हाला अनेक भन्नाट कल्पना मिळतील. या फोटोत दिसणाऱ्या जोडप्याचे नाव अमेय येलमकर आणि प्रियंका निरगुळकर आहे.
-
फोटोशूटसाठी तुम्ही अशाप्रकारे सारखे कपडे परिधान करू शकता, यामध्ये वेगवेगळ्या पोझमध्ये शूट करू शकता.
-
लग्नात बहुतांश वेळा पारंपरिक कपडे परिधान केले जातात. त्यामुळे जर तुम्हाला वेस्टर्न लूक आवडत असेल तर ‘प्री वेडिंग शूट’मध्ये तुम्ही वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट करू शकता.
-
वेगवेगळ्या भारतीय पोशाखांमध्ये फोटोशूट करू शकता.
-
निसर्गाच्या सानिध्यातील असे कॅण्डिड फोटो लक्षवेधी ठरतात.
-
अशाप्रकारे ‘कलर स्मोक’चा वापर करून तुमचे फोटो अधिक आकर्षित करू शकता.
-
समुद्रकिनारी अशाप्रकारे फोटोशूट करण्यास अनेकजण पसंती देतात.
-
सहजीवनातील प्रवासाची सुरुवात यांसारखी पोझ तुम्ही फोटोशूट करताना निवडू शकता.
-
एकमेकांना मदत करतानाचे ‘कॅण्डिंड मोमेन्ट्स’
-
सूर्यास्ताच्यावेळी समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणात केलेला हा ‘परफेक्ट क्लिक’ म्हणता येईल, तुम्हीही अशाप्रकारचा फोटो ट्राय करू शकता.
-
प्रत्येक फोटोशूटला थोडा फिल्मी टच हा असतोच. बॉलीवूड चित्रपटातील गिटार वाजवणारा हिरो आणि त्याच गाणं ऐकणारी हिरोइन ही सर्वांची आवडती पोज तुम्हीही ट्राय करू शकता.
-
समुद्र किनाऱ्यावरील मजा दाखवणाऱ्या गोंष्टीचे सर्व गोष्टींचे शूट तुम्ही करू शकता
-
कपड्यांचे कलर कॉम्बिनेशन करत फोटोशूट आकर्षक ठरते. डिजिटल वेडिंग इन्व्हिटेशनसाठी तुम्ही अशा पोजमध्ये फोटोशूट करू शकता.
-
अशा वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट करू शकता.
-
फक्त चित्रपटात पाहायला मिळणारे असे दृश्य आपल्याबरोबरही व्हावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते, तुम्हीही ही पोज ट्राय करू शकता.
-
वेगवेगळ्या पारंपरिक पोशाखातील फोटोशूट नेहमीच आकर्षक ठरते.
-
अशा वेगवेगळ्या पोझ तुम्ही ट्राय करू शकता.
-
प्रत्येक जोडपं हे एखादा चित्रपट किंवा गाण्यानेच प्रभावित झालेले असतात. त्यामुळे प्री वेडिंग फोटोशूट करण्याआधी तुम्ही तुमच्या कल्पना नीट फोटोग्राफर्सना समजवून सांगा यामुळे तुम्हाला हवे तसे फोटो मिळू शकतील.
-
लग्नाचं चित्रीकरण करण्यापेक्षाही लग्नाआधी असे हटके अल्बम करण्याची इच्छा अनेक जोडप्यांची असते. कारण लग्नाचे विधी सुरू असताना किंवा त्या दिवशी प्री-वेडिंग शूटसाठी तयारी करणंच शक्य नसतं.
-
अगदी कपड्यांपासून ते शूट करण्याच्या जागेपर्यंत सर्व गोष्टी यासाठी ठरवाव्या लागतात. या सर्व गोष्टींचे पुर्वनियोजन करून हे फोटोशूट केल्यास ऐनवेळी कोणतीही गडबड होणार नाही.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल