-
दिल्लीतील हॉटेल रेडिसन ब्ल्यूचे मालक अमित जैन यांनी शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेचा तपास सध्या सुरु असून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र, अमित जैन यांच्यावर बँकेच्या कर्जाचा भार होता अशी माहिती मिळाली आहे.
-
दरम्यान, उद्योगपतीने आत्महत्या करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही काही प्रसिद्ध उद्योजकांनी आत्महत्या केल्याने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. आज आपण अशा काही उद्योगपतींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतला.
-
सीसीडी या नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘कॅफे कॉफी डे’चे संस्थापक व्हीजी सिद्धार्थ यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला होता.
-
२९ जुलै २०१९ च्या रात्रीपासून बेपत्ता असलेले व्हीजी सिद्धार्थ यांचा मृतदेह ३६ तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर मंगळुरूमधील नेत्रावती नदीच्या काठावर सापडला. (Reuters)
-
३० जुलै रोजी, त्यांचे एक पत्र मीडियामध्ये आले, जे त्यांनी कॅफे कॉफी डेच्या कर्मचार्यांना आणि संचालक मंडळाला लिहिले होते.
-
आपल्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, ‘माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची निराशा केल्याबद्दल मला खेद वाटतो.’
-
२०१६ मध्ये, एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विनीत व्हिग यांच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले होते. (Vinit facebook)
-
गुरुग्राममधील सायबर सिटीमधील बेलवेडेअर पार्कच्या १९ व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली होती. (Vinit facebook)
-
पोलिसांना त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये तो स्वतःला कंटाळून आपले जीवन संपवत असल्याचे लिहिले होते. (Vinit facebook)
-
तंत्रज्ञ-उद्योजक असलेल्या लकी गुप्ता अग्रवाल यांनी २०१६ साली नायट्रोजन वायूचा श्वास घेऊन आपले जीवन संपवले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याच्या स्टार्ट-अपच्या अपयशानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
-
लेजर ट्रॅव्हल कंपनी राज ट्रॅव्हल वर्ल्डचे संस्थापक ललित शेठ यांनी ऑगस्ट २०१२ मध्ये वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून आत्महत्या केली होती. ललित शेठ यांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवल्याचा दावा अनेक वृत्तांमध्ये करण्यात आला होता.
-
साजन परायल हा नायजेरियातील व्यापारी होता. नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या १६ कोटी रुपयांच्या ‘स्टेट ऑफ आर्ट’साठी आवश्यक प्रमाणपत्रे देण्यास नकार दिला. यानंतर १८ जून २०१९ रोजी कोट्टाली येथील त्यांच्या घरी तो मृतावस्थेत आढळून आला होता.

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO