-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.
-
अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करत या संदर्भात माहिती दिली आहे.
-
आनंद पिरामल यांच्याशी लग्न झाल्यानंतर चार वर्षांनी १९ नोव्हेंबर रोजी ईशाला एक मुलगी आणि एक मुलगा झाला.
-
या जोडप्याने मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे.
-
ईशा आणि आनंद व्यतिरिक्त, देशात इतरही अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत जे जुळ्या मुलांचे पालक आहेत.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा हिने जून महिन्यात दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत लग्नगाठ बांधली.
-
लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच नयनतारा आई झाली. सरोगसीचा मदतीने नयनताराच्या घरी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला.
-
विग्नेश शिवनने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.
-
बॉलिवूडमधील संजू बाबा अर्थात अभिनेता संजय दत्तने मान्यताबरोबर २००८ साली लग्न केले.
-
या दोघांना शाहरान आणि इकरा ही जुळे मुले आहेत.
-
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तीन मुलांची आई आहे.
-
सनीने सरोगसीच्या मार्गाचा अवलंब करत जुळ्या मुलांचं पालकत्वं स्वीकारलं.
-
सनीच्या जुळ्या मुलांची नावं नोआ आणि अशर अशी आहेत.
-
बॉलिवूडमधील निर्माता करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्वीकारले.
-
करण जोहरच्या दोन जुळ्या मुलांचा ७ फेब्रुवारी २०१७ रोजी जन्म झाला.
-
करणच्या मुलांची नावे रुही आणि यश अशी आहेत.
-
२०१३ साली विवाहबंधनात अडकलेल्या विनोदवीर कृष्णा अभिषेक आणि कश्मीराने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला.
-
आपल्या तालावर प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला ठेका धरायला लावणारी नृत्यदिग्दर्शिका फराह खानला आन्या, दीवा आणि सझर ही तिळी मुले आहेत.
-
फराह तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या मुलांचे सुंदर फोटो शेअर करत असते.
-
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याच्या पत्नीने २७ जून २०२१ रोजी जुळ्याच्या बाळांना जन्म दिला.
-
त्यांनी मुलाचे नाव सर्वज्ञ ठेवले आहे तर मुलीचे नाव स्रग्वी असे ठेवले आहे.
-
प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकरने २०१७ साली एनसीबी अधिकारी समीर वानखेडेशी लग्न केलं.
-
या दोघांनीही अगदी साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. २०१८ साली क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला.
-
टीव्ही अभिनेता हितेन तेजवानी आणि अभिनेत्री गौरी प्रधान २००९ मध्ये जुळ्या मुलांचे पालक झाले.
-
अभिनेत्री सेलिना जेटलीने २०१२ साली जुळ्या मुलांना जन्म दिला.
-
व्हिस्टन आणि विराज अशी सेलिनाच्या जुळ्या मुलांची नावं आहेत.
-
सर्व फोटो : इन्स्टाग्राम

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी