-
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्रदर्शनासाठी देशभरात प्रसिद्ध आहे.
-
वाघाला बघण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक ताडोबात येत असतात.
-
ताडोबातील वाघही पर्यटकांना कधीच निराश करत नाही.
-
सध्या ताडोबात व्याघ्र दर्शनाचा हंगाम सुरु असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत.
-
ताडोबा प्रकल्प नेहमीच पर्यटकांची पहिली पसंती ठरत आला आहे.
-
नेते अभिनेत्यांसह खेळाडूंनाही ताडोबा अभायारण्याची भुरळ पडते.
-
महानायक अमिताभ बच्चन, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नागपूरला क्रिकेट सामना खेळण्यासाठी येणारे क्रिकेटपटू ताडोबाला भेट दिल्याशिवाय परत जात नाहीत.
-
चला हवा येऊ द्या फेम भारत गणेशपुरेंनी नुकतेच ताडोबा अभयारण्याला भेट दिली.
-
जंगल सफारी करीत असतानाच त्यांना माया वाघिणीचे (टी १२) व एक नर वाघाचे दर्शन झाले.
-
न्यप्रेमी पर्यटकांनी ताडोबामध्ये एकदा तरी निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन भारत गणेशपुरेंनी केले आहे.
-
‘माया’ नावाची वाघिण या व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण मानली जाते.
-
ताडोबात आलेल्या प्रत्येक पर्यटकाला या वाघिणीला पाहण्याची इच्छा असते.
-
ताडोबात बिबळ्या, नीलगाय, चितळ, हरण, सांबर, अस्वल, साळिंदर, चांदीअस्वल, भेकर, रानमांजर, ढोल जंगली कुत्रे, खवले मांजर, चौसिंगा, रानगवा व इतरही अनेक प्राणी आहेत.
-
वाघासोबत रानगवाही ताडोबाचे मुख्य आकर्षण आहे.
-
ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना हमखास वाघाचे दर्शन होतेच.
-
ताडोबा अभयारण्याचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळून संयुक्तपणे हा प्रकल्प बनलेला आहे
-
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनासाठी कोअर क्षेत्रातील एकूण ६ आणि बफर क्षेत्रातील १४ प्रवेशद्वारे आहेत.
-
महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे.
-
ताडोबात व्याघ्र दर्शनासाठी पर्यटकांना http://www.mytadoba.org या संकेतस्थळावरुन बुकींग करता येऊ शकते
-
इतर कोणत्याही वेबसाइटवरून नोेंदणी करू नये, असे आवाहन टीएटीआरने केले आहे.
-
फोटो सौजन्य (लोकसत्ता छायाचित्रकार – देवानंद साखरकर)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार