-
तीचं नाव ‘शर्मिली’… पर्यटक दिसताच लाजून झाडाआड लपणारी, पण तिच्या नैसर्गिक अधिवासाची ती अनभिषिक्त सम्राज्ञी.
-
तिच्या या साम्राज्यात कुणी प्रवेश केला तर मात्र आक्रमक रुप धारण करणारी. याच ‘शर्मिली’ने तिच्या अधिवासाबाहेर जाऊन पाच माणसांचा बळी घेतला.
-
त्यात दोषी कोण हे ठाऊक नाही, पण बछड्यांसोबतची ‘शर्मिली’ पाहिल्यानंतर या घटनेवर विश्वास नक्कीच बसत नाही.
-
चार वर्षांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तिचा तीन बछड्यांसोबत खेळातानाचा व्हिडीओ खुप पसरला.
-
पर्यटकांची चाहूलही लागली तर ती त्यांच्यासमोर येणे शक्यतोवर टाळते. तासाभराच्या मागोव्यानंतर कधीतरी दर्शन देते.
-
देखणी आणि भव्य असलेल्या ‘शर्मिली’ सावज दिसताच वेगाने पाठलाग करुन झडप घेतानाही पर्यटकांनी अनेकदा पाहिले आहे.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील आगरझरी बफरझोन हे तिचे साम्राज्य आणि या साम्राज्यात एकदा ‘डब्ल्यू’ या वाघिणीने प्रवेश केला.
-
वाघ असो वा वाघीण, आपल्या अधिकारक्षेत्रात कुणाला प्रवेश करु देत नाही. त्यामुळे एकदा ‘डब्ल्यू’ ही वाघीण नसल्याचे पाहून तिच्या बछड्यांवर ‘शर्मिली’ने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या बछड्यांप्रती ‘शर्मिली’ तेवढीच संवेदनशील.
-
सर्व छायाचित्रे – राहुल कुचनकर (हेही पाहा : तोरा दाखवणारी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी मधू’)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य