-
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अलिबागमध्ये आठ एकर जागा खरेदी केली होती.
-
विराटने ही जमीन एकूण १९ कोटी २४ लाख ५० हजार रुपयांना खरेदी केली होती.
-
या जागेसाठी त्याने १ कोटी १५ लाख ४५ हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली होती.
-
त्यादरम्यान आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत असलेल्या विराटसाठी त्याच्या भावाने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे हा व्यवहार पूर्ण केला होता.
-
विराट अलिबागमधील या हवेशीर जागेवर फार्महाऊस बांधणार आहे.
-
विराट-अनुष्काच्या अलिबागमधील घराची झलक आता समोर आली आहे.
-
विराट-अनुष्का अलिबागमधील आवास गावात खरेदी केलेल्या जागेवर चार बीएचके फार्महाऊस बांधणार आहेत.
-
‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चार बीएचके फार्महाऊस बांधण्यासाठी १०.५ ते १३ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
-
विरुष्काचं अलिबागमधील फार्म हाऊस ‘आवास वेलनेस’ या फर्मकडून डिझाइन करण्यात येणार आहे.
-
‘आवास वेलनेस’ यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन विरुष्काच्या अलिबागमधील घराचे थ्रीडी डिजिटल मॉडेलचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
-
विराट-अनुष्काच्या अलिबागमधील या आलिशान घरात चार बेडरुम, चार बाथरुम व दोन गॅरेज असणार आहेत.
-
याबरोबरच विरुष्काच्या फार्म हाऊसला टेरेसही असणार आहे.
-
विरुष्कासाठी खास स्विमिंग पूलही बांधण्यात येणार आहे.
-
स्विमिंगपूलजवळच डायनिंग एरिया तयार करण्यात येणार आहे.
-
विरुष्काच्या अलिबागमधील या फार्म हाऊस बाहेर मोठा गार्डन एरिया तयार करण्यात येणार आहे.
-
“विराटला मॉडर्न व क्लासिक असं इंटेरिअर हवं आहे. इथे आल्यावर शांत व रिलॅक्स वाटेल, असं घर त्याला पाहिजे. त्याला चमकदार इंटेरिअर नको आहे”, असं आवास वेलनेच्या सीईओंनी सांगितलं.
-
(सर्व फोटो: विराट कोहली, आवास वेलनेस/ इन्स्टाग्राम )
India vs New Zealand LIVE, Champions Trophy 2025 Final: किवींनी भारताला जेतेपद पटकावण्यासाठी इतक्या धावांचे दिले आव्हान, ब्रेसवेल-मिचेलची उत्कृष्ट अर्धशतकं