-
सोशल मीडियावर सध्या एक अनोखं वेडिंग फोटोशूट चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या लग्नसराईचं सीजन आहे म्हणून नाही, तर या फोटोशूटमधील वेगळेपण म्हणजे हे वेडिंग फोटोशूट नवऱ्या मुलाशिवाय करण्यात आलंय.
-
वास्तविक, दोन नववधूंनी हे अनोखे फोटोशूट केले आहे. या मुली कॉलेजच्या मैत्रिणी आहे. अदिला १२वीला असतानाच फातिमाच्या प्रेमात पडली होती आणि आता दोघींनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे.
-
मात्र आपले प्रेम मिळवण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे कुटुंब आणि समाज या दोघींच्या विरोधात होता. आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना कोर्टाचीही पायरी चढावी लागली. चला जाणून घेऊया या अनोख्या प्रेमकहाणीबद्दल.
-
फातिमा नूरा आणि अदीला नसरीन या केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अदिला १२वीत असताना फातिमाच्या प्रेमात पडली. तेव्हा त्या दोघीही सौदी अरेबियात शिकत होत्या.
-
मात्र, त्यांचे हे नाते त्यांच्या कुटुंबीयांना आवडले नाही. अगदी नाट्यपूर्णरीतीने त्यांनी या जोडप्याला वेगळे केले आणि त्यांच्यासाठी मुलगा शोधण्यास सुरुवात केली.
-
फातिमा आणि अदिला यासाठी तयार नव्हत्या आणि दोघीही १९ मे २०२२ ला घरातून पळून गेल्या. यानंतर त्यांनी आपल्या हक्कांसाठी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली.
-
३१ मेला उच्च न्यायालयाने या दोघींना एकत्र राहण्याची दिली. तेव्हापासून फातिमा आणि अदिला चेन्नईमध्ये एकत्र राहत आहेत.
-
मिळालेल्या माहितीनुसार फातिमा आणि अदिला एका आयटी कंपनीत काम करतात. नुकतंच त्यांनी केलेलं वेडिंग फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
-
एका मुलाखतीत या जोडप्याने सांगितले की, दोघींनी अद्याप लग्न केलेले नाही. हायकोर्टाने दोघांना एकत्र राहण्याची परवानगी दिली असली तरी त्यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता नाही.
-
तथापि, त्यांचाही सध्या लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. वेळ आल्यावर त्या लग्न करतील, असेही त्या म्हणाल्या.
-
फातिमा आणि अदिला यांना कोणत्याही कायदेशीर सुविधा मिळू शकत नाहीत, तरीही दोघींना एकत्र राहायचे आहे. त्यांनी म्हटलंय, कोणी त्यांचे लग्न कायदेशीर मानत असले किंवा नसले तरी एक दिवस त्या नक्कीच लग्न करतील.
-
ही जोडी सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. दोघांनाही इंस्टाग्रामवर जवळपास 30-30 हजार लोक फॉलो करतात. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम/Fathima Noora)
महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन