-
‘बिग बॉस हिंदी’चं सोळावं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या पर्वात चार सदस्यांनी वाइल्ड कार्डमधून एन्ट्री घेतली.
-
वाइल्ड कार्डमधूनच गोल्डन बॉइज सनी नानासाहेब वाघचौरे व संजय गुजर यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.
-
सनी व संजय दोघेही मुळचे पुण्याचे आहेत. Golden Guys म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
-
सनी वाघचौरे व संजय गुजर दोघेही कायम गळ्यात अडीच ते तीन किलोचे सोन्याचे दागिने घालून फिरतात.
-
अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना बोलावलं जातं.
-
‘गोल्डन गाइज’ म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या सनी व संजयकडे महागड्या कारचं कलेक्शन आहे.
-
विशेष म्हणजे या सगळ्या कारलाही सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे.
-
जॅग्वार एक्सई ही सुमारे ५० लाख किमतीची कार त्यांच्याकडे आहे.
-
मोठमोठ्या सेलिब्रिटींकडे असणारी ‘ऑडी क्यू ७’ ही गाडीही गोल्डन बॉइजकडे आहे.
-
या गाडीची किंमत सुमारे ८५ लाख इतकी आहे.
-
गोल्डन बॉइजने त्यांच्याजवळ असलेल्या मर्सिडीज बेन्झलाही सोन्याचा मुलामा दिलेला आहे.
-
५८ लाखांच्या गाडीतून फिरताना अनेकदा गोल्डन बॉइज दिसतात.
-
याशिवाय त्यांच्याकडे २.८ कोटी किंमत असलेली रेंज रोव्हरही आहे.
-
‘गोल्डन गाइज’ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
सनी वाघचौरेचे इन्स्टाग्रामवर १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
तर संजय गुजरचे १ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
आता गोल्डन गाइजमुळे बिग बॉसच्या घरातील समीकरणं कशी बदलणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. (सर्व फोटो: सनी वाघचौरे, संजय गुजर/ इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”