-
मागच्या महिनाभरापासून टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.
-
दोघेही वेगळे राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जातंय.
-
पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री आयेशा उमरमुळे सानिया मिर्झा आणि शोएबचं नातं बिघडल्याचंही म्हटलं जातंय.
-
आयेशा शोएबची चांगली मैत्रीण आहे, दोघांनी एकत्र अनेक फोटोशूट केले आहेत.
-
दरम्यान, तिच्यामुळे घटस्फोट होत असल्याच्या चर्चांवर मौन सोडत आयेशा उमरने प्रतिक्रिया दिली आहे.
-
सोशल मीडियावर एका व्यक्तीने आयेशाला विचारले की तू आणि शोएब मलिक लग्न करणार आहात का?
-
यावर प्रतिक्रिया देताना आयेशा म्हणाली, नाही, अजिबात नाही. तो विवाहित आहे आणि तो आपल्या पत्नीसोबत खूप आनंदी आहे.
-
आयेशा पुढे म्हणाली, मी शोएब मलिक आणि सानिया मिर्झा या दोघांचा खूप आदर करते.
-
शोएब आणि मी चांगले मित्र आहोत आणि एकमेकांची खूप काळजी घेतो. याशिवाय काहीच नाही, असं आयेशा म्हणाली.
-
दरम्यान, आयेशा आणि शोएबचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
त्यानंतर आयेशामुळे शोएब आणि सानियाचा घटस्फोट होत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती.
-
(सर्व फोटो – शोएब मलिक व आयेशा उमरच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख