-
नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पाहणी केली. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)
-
सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
-
तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी एकाच वाहनातून नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या मार्गाची प्रत्यक्ष वाहनाद्वारे पाहणी केली.
-
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व:त कार चालवली. मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या बाजूला बसून होते.
-
विशेष म्हणजे, त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा वेग १८० च्या पुढे असल्यामुळे पाहणी दौऱ्यादरम्यान काय त्या गाड्या, काय त्यांचा वेग, अशी एकच चर्चा रंगली होती.
-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ डिसेंबर रोजी एकाच वाहनातून मार्गाची पाहणी केली.
-
वाशीम जिल्हयातील ईरळा (ता. मालेगाव) येथील बेस कॅम्पजवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा ताफा अत्यंत वेगाने आला आणि तेवढ्याच वेगाने पुढे निघूनही गेला.
-
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या डीबी पथकाची वाहने आणि इतर महागडी वाहने मागेच होती.
-
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा वेग पाहून प्रत्येकांच्या तोंडी काय त्या गाड्या, काय त्यांचा वेग, बस एवढीच चर्चा रंगली होती.
-
त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत असलेल्या ‘मर्सडीज बेन्ज’ कंपनीच्या एम एच ४९ बीआर ०००७ हा क्रमांक असलेल्या निळसर रंगाच्या कारच्या वेगाने अनेकांना अचंबित केले.
-
‘मर्सडीज बेन्ज’ कंपनीची ही कार स्वत: उपमुख्यमंत्री फडणवीस चालवत होते. अगदी कार्यकर्त्यांची दुतर्फा गर्दी असलेल्या ठिकाणीही फडणवीसांच्या हाती गाडीचं स्टेअरिंग होतं. तर बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले होते.
-
या ताफ्यात फडणवीस चालवत असलेली ‘मर्सडीज बेन्ज’ची ही कार सर्वात पुढे तर इतर वाहने तिच्या मागे धावत होती.
-
फडणवीसांनी चालवलेली गाडी बांधकाम व्यावसायिक विक्की कुकरजा यांची आहे.
-
त्यामुळे कोण आहेत कुकरेजा आणि त्यांचा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षशी काय संबध हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. गाडीचे मालक असलेल्या कुकरजांचं भाजपा कनेक्शनही आता पुढं आलं आहे.
-
विक्की कुकरजा हे शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आहेत. भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. २०१७ मध्ये ते प्रथम भाजपकडून जरीपटका भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस होते.
-
फडणवीसांशी असलेली घनिष्ठ मैत्री यामुळे कुकरेजा यांना महापालिकेत अल्पकाळातच अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली. एक यशस्वी उद्योजक, राजकारणी अशी ओळख कुकरेजा यांची असली तरी अनेक घटनांमध्ये त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्याने ते चर्चेत आले होते. यात महिलांना मारहाणीचा, उत्तर नागपुरातील उद्यानासाठी राखीव जागा हडपण्याच्या आरोपांचा यात समावेश आहे.
-
रविवारी उपमुख्यमंत्र्यांनी जी गाडी चालवली ती कुकरेजा इन्फास्टृक्चर या कंपनीच्या नावावर नोंदवली असूनही ही कंपनी विक्की कुकरेजा यांची आहे. या गाडीची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात…
-
फडणवीसांनी चालवलेली गाडी ही ‘मर्सडीज बेन्ज’ची जी ३५०डी मॉडेलची कार आहे. ही मर्सडीजच्या भारतातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे.
-
मर्सडीज बेन्ज जी ३५०डीमध्ये तीन लिटरचं सहा सिलेंडर असलेलं डिझेल इंजिन आहे. यामधून २८५ पीएस ऊर्जा आणि ६०० एनएम टॉर्क निर्माण होतो.
-
मर्सडीज बेन्ज जी ३५०डीमध्ये ९ गेअर आहेत.
-
या कंपनीच्या जी सीरीजमधील गाड्या या ऑफ रोडिंग म्हणजेच ओबडधोबड रस्त्यांवरील ड्रायव्हिंगसाठी प्रामुख्याने वापरल्या जातात.
-
ही गाडी अवघ्या ७.४ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते.
-
या गाडीमध्ये २० इंचांचे अलॉय व्हिल्स असून गाडीचा ग्राऊण्ड क्लियरन्स हा २४१ मिलीमीटर इतका आहे.
-
या गाडीमध्ये थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, नऊ एअरबॅग्स, पॉवर आणि व्हेटीलेटेड फ्रण्ट सीट्स अशा सुविधा उपलब्ध आहेत.
-
या गाडीमध्ये ‘मर्सडीज मी कनेक्ट कार टेक्नॉलॉजी’ या तंत्रज्ञानाचाही समावेश असून इनबिल्ट अशी सेवा उपलब्ध असलेली ही देशातील पहिली कार आहे.
-
या गाडीमध्ये दोन १२.३ इंचाचे फ्रंट डिस्प्ले आहेत. यामध्ये ड्राइव्हींग करताना उपलब्ध होणारी आकडेवरी, मल्टी इन्फोमेट्री डिस्पेल आणि टचस्क्रीन इन्फोर्टेन्मेंटसारख्या सुविधा आहेत.
-
‘मर्सडीज बेन्ज’ या गाडीचा टॉप स्पीड १९९ किमी प्रति तास इतका असून या गाडीची एक्सशोरुम किंमत २ कोटी २ लाख रुपये इतकी आहे.

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…