-
Tadoba-Andhari National Park: ‘वाघडोह’ची पहिली जोडीदार होण्याचा मान ‘माधूरी’ला मिळाला.
-
सातत्याने ‘वाघडोह’सह फिरण्यामुळेच ‘माधूरी’ प्रसिद्धही झाली.
-
ही ताडोबाची वाघीण म्हणजेच ‘माधूरी’.
-
‘वाघडोह’ आता हयात नाही.
-
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील तेलिया या क्षेत्रावर या दोघांनी बराच काळ राज्य केले.
-
याच माधूरीने तब्बल पाचवेळा आई होण्याचा मान मिळवला आणि १९ बछड्यांना जन्म दिला.
-
त्यामुळेच ती ताडोबाची ‘सुपर मॉम’ म्हणूनही ओळखली जाते.
-
खरे तर एक वाघीण तिच्या दहा ते बारा वर्षाच्या आयुष्यात सहा ते आठ बछड्यांना सांभाळू शकते, पण ‘माधूरी’ने हा विक्रम मोडला.
-
ती आणखी प्रसिद्ध झाली तर तिच्या चार बछड्यांमुळे.
-
ते सर्व मादी बछडे, जे आता मोठे झाले आहेत. ‘सोनम’, ‘लारा’, ‘गीता’ आणि ‘मोना’ अशी त्यांची नावे, जी पर्यटकांनीच ठेवली.
-
‘माधूरी’ आणि ‘वाघडोह’ यांची ही पहिली चार अपत्ये, ज्यावर डिस्कव्हरी वाहिनीने ‘टायगर सिस्टर्स ऑफ तेलिया’ या नावाचा चित्रपट निघाला आणि तो चांगलाच गाजला.
-
सर्व छायाचित्रे – अरविंद बंडा (हेही पाहा : पर्यटक दिसताच लाजून झाडाआड लपणारी ‘शर्मिली’)

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य