-
पालघर येथील रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर अफताब पूनावाला याने दिल्लीत तिचा निर्घृण खून केला आहे.
-
नराधम आरोपीनं श्रद्धाचे मृतदेहाचे ३५ तुकडे करून विविध परिसरात फेकले आहेत.
-
खूनाच्या या घटनेनंतर मृत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वसई येथील तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
-
सुरुवातीच्या काळात पोलिसांनी आपल्याला योग्य ते सहकार्य केलं नाही. त्यामुळे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला. – विकास वालकर
-
त्यावेळी पोलिसांनी दखल घेतली असती, तर माझी मुलगी आज जिवंत असती, असा आरोप विकास वालकर यांनी केला आहे.
-
माझी मुलगी श्रद्धा वालकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अत्यंत दु:ख झालं आहे. हे दु:ख आम्ही कधीच विसरू शकणार नाही. – विकास वालकर
-
आतापर्यंत दिल्ली पोलीस व वसई पोलीस यांच्याकडून संयुक्त तपास व्यवस्थितपणे सुरू आहे.- विकास वालकर
-
पण अगदी सुरुवातीला वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या असहकार्यामुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबाबत चौकशी व्हावी. – विकास वालकर
-
पोलिसांनी त्यावेळी सहकार्य केलं असतं, तर माझी मुलगी आज जिवंत असती. काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. -विकास वालकर
-
अफताब पूनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेनं हत्या केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी. – विकास वालकर
-
तसेच त्याचे आई-वडील आणि भाऊ यांचीही सखोल चौकशी व्हावी आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. – विकास वालकर
-
या कटात आणखी कुणी सामील असेल तर त्यांचीही चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मी अपेक्षा करतो. -विकास वालकर

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी