-
जगभरात आपल्या आयफोनसाठी (iphone) प्रसिद्ध असलेली कंपनी अॅपल (Apple) लवकरच वाहन क्षेत्रात प्रवेश करणार आहे.
-
ही कार बनवण्यासाठी अॅपलने जगातील सर्वोत्तम ऑटोमोबाईल कंपन्यांच्या इंजिनिअर्सची टीम तयार केली आहे.
-
जागतिक बाजारात अॅपलची कार (apple car) येणे जवळपास निश्चित झाले आहे.
-
अॅपल टेस्लासह ऑडी, बीएमडब्ल्यू (BMW),मर्सिडीज यांसारख्या जवळपास सर्व ब्रँडशी स्पर्धा करेल. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रातील बड्या कंपन्याही चिंतेत आहेत. यामुळे एलाॅन मस्कच्याही चिंतेत भर पडली आहे.
-
ही कार सेल्फ ड्रायव्हिंग असेल. टेक कंपनी अॅपलच्या सेल्फ-ड्राइव्ह प्रकल्पाचे नाव टायटन आहे.
-
अॅपलने एक सेल्फ-ड्रायव्हिंग वाहन डिझाइन केले आहे ज्यामध्ये स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सचा समावेश आहेत. अपडेटेड प्रोजेक्ट टायटन डिझाइन कारची सेल्फ-ड्रायव्हिंग क्षमता राष्ट्रीय महामार्गांपुरती मर्यादित आहे.
-
अॅपलच्या कारमध्ये जबरदस्त हार्डवेअर, टॉप नोज सॉफ्टवेअर आणि जबरदस्त सिक्युरिटी फीचर्स ग्राहकांना पाहायला मिळणार आहेत. तसेच अॅपलची कार तुमच्या डिव्हाइसवरूनही ऑपरेट केली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.
-
कंपनी प्रथम उत्तर अमेरिकेत ही कार लॉन्च करणार आहे. यानंतर, कालांतराने कारमध्ये सुधारणा करताना इतर ठिकाणी देखील विक्री केली जाईल. अॅपलच्या कारला कंपनीच्या पॉवरफुल कॉम्प्युटरचा सपोर्ट मिळेल, ज्याचं कोडनेम डेनाली असणार आहे.
-
या कारच्या लाँचची तारीख २०२६ पर्यंत पुढे ढकलली गेली आहे. अॅपल या कारवर बऱ्याच काळापासून काम करत आहे. अॅपलच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत USD १००,००० म्हणजेच (८२.५१ लाख) पेक्षा कमी असेल. (फोटो सौजन्य – Nathanielnuelw/Twitter And Financial Express)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”